शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ‘डिप्रेशन’ वाढविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST

हिंगोली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने लोकांमधील डिप्रेशन वाढविल्याचे दिसून येत आहे. अशावेळी डिप्रेशनमध्ये गेलेल्यांनी मनाने गोळ्या घेण्याऐवजी तज्ज्ञ ...

हिंगोली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने लोकांमधील डिप्रेशन वाढविल्याचे दिसून येत आहे. अशावेळी डिप्रेशनमध्ये गेलेल्यांनी मनाने गोळ्या घेण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच गोळ्या वा इतर औषधी घ्यावीत, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दीपक डोणेकर यांनी दिला आहे.

गत दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेकांचे कामधंदे बंद झाले आहेत, अनेकजण आहे त्या कामावरून घरी बसविले आहेत. अशावेळी त्यांच्यामध्ये डिप्रेशन येणे सहाजिकच, असे असताना त्यांनी डिप्रेशनमध्ये न जाता मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. निराश होऊन कोणत्याही गोळ्या घेणे म्हणजे ते शरीरासाठी हानिकारच असते.

डिप्रेशन (उदासीनता) हे सौम्य, मध्यम आणि अतिशय तीव्र अशा तीन टप्प्यांमध्ये मोडले जाते. विशेष म्हणजे डिप्रेशन हे अनुवंशिक असते. कुणाला आईकडून, कुणाला वडिलांकडून तर कुणाला आजी-आजोबांच्या रक्तातून डिप्रेशन हे कोणत्याही मार्गाने येऊ शकते. त्यामुळे माणूस उदासीन बनतो. यामध्ये बाहेरील वलयही त्यास कारणीभूत असू शकते. यामध्ये कर्ज, व्यसन आदींचा समावेश करता येईल. कधी-कधी छोट्या व मोठ्या आजारांमुळेही माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. हल्ली डिप्रेशनमध्ये जाण्याचा मुख्य मार्ग म्हणजे नोकरी आहे.

लक्षणे...

डिप्रेशनमध्ये जाण्याची काही प्रमुख लक्षणे आहेत. यामध्ये उदास वाटणे, झोप न येणे, जेवण कमी जाणे, तेच तेज विचार येणे, आत्महत्याचे विचार येणे, डोके जड राहणे, छोट्या- छोट्या गोष्टीच्या कारणांवरून चिडचिड होणे, विसरभोळेपणा येणे, जगावेसे न वाटणे, कामात मन लागणे आदी कारणांचा समावेश आहे.

उपाय ...

पूर्ण झोप घेतल्यास कोणताही व्यक्ती डिप्रेशनमध्ये जात नाही. दिलेल्या कामापेक्षा जास्त काम लागत असेल तर काही दिवसांकरिता त्याने सुटी घेणे हे त्याच्यासाठी फायद्याचेच आहे. जेवणात चांगला आहार ठेवत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे हे अशा डिप्रेशनमध्ये गेलेल्या व्यक्तीसाठी लाभदायकच असे आहे. योगाबरोबर सकाळच्यावेळी फिरायला गेल्यास हेही उत्तमच आहे.

डॉ. दीपक डोणेकर, मानसोपचार तज्ज्ञ, हिंगोली

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना डिप्रेशन आले असले तरी अशा कोणत्याही प्रकारच्या गोळ्या किंवा औषधी विकली गेली नाहीत. विशेष म्हणजे कोरोना बरा होण्यासाठी आयुर्वेदिक औषधी मात्र अनेक जण घेऊन जातात. आयुर्वेदिक औषधाला मागणीही आहे. बाकी इतर आजारांची औषधीही रुग्ण घेऊन जात आहेत.

- मनोज आखरे, औषधी व्यवसायिक, हिंगोली