शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शाळाबाह्य मुलांच्या शोध माेहिमेत कोरोनाचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:29 IST

हिंगोली : शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने राज्यभर ...

हिंगोली : शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने राज्यभर शोध मोहीम राबविण्यात येत असली, तरी हिंगोली जिल्ह्यात मात्र शाळाबाह्य शोध मोहिमेला अद्याप मुहूर्त मिळाला नसल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे नियोजनासंदर्भातील केंद्रस्तरावरील बैठकही पुढे ढकलावी लागल्याने शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण कधी केले जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

कामानिमित्त पालकांचे होणारे स्थलांतर, शैक्षणिक सुविधेचा अभाव, पालकांचे अज्ञान यामुळे शाळाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. गतवर्षीही शाळाबाह्य मुले आढळली होती. बालकांचा शिक्षणाचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यान्वये ६ ते १४ वर्ष वयोगटातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. अशा मुलांचा वस्त्या, रेल्वे स्थानक, बसस्थानक, गुऱ्हाळ, पाल, वीटभट्टी, कारखाना आदी ठिकाणी शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेश देणे आदी कामे शिक्षण विभाग दरवर्षी करत असतो. यावर्षीही शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी दिनांक १ ते १८ मार्चदरम्यान मोहीम राबविण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले होते. राज्यभर तशी तयारी केली जात असली, तरी हिंगोली जिल्ह्यात मात्र कोरोनामुळे अद्याप शोध मोहिमेला मुहूर्त मिळालेला नाही. या संदर्भात २५ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरावर तर २६ रोजी तालुकास्तरावर बैठक घेण्यात आली तसेच २७ फेब्रुवारी रोजी केंद्रस्तरावर बैठक होणार होती. मात्र, कोरोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेता, ही बैठक रद्द करावी लागली. त्यामुळे शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेला कधी मुहूर्त मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

कन्टेनमेंट झोनमध्ये होणार नाही सर्वेक्षण

शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेला सुरुवात झाल्यास जिल्ह्यातील कन्टेनमेंट झोनमध्ये मात्र सर्वेक्षण करण्यात येणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच मोठे गाव असल्यास अशाठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करावे, अशा सूचना दिल्या जाणार आहेत.

शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक व अंगणवाडी सेविकांना प्रगणक म्हणून नियुक्त केले जाणार आहे. तसेच कुटुंब, शाळाबाह्य मुले, स्थलांतरित झालेल्यांची नाेंद अ, ब, क, ड प्रमाणे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

तालुकानिहाय शाळा

हिंगोली - १६६

सेनगाव - १६७

वसमत - १८९

कळमनुरी - २००

औंढा - १५७

एकूण - ८७९

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासंदर्भात जिल्हा व तालुका स्तरावर बैठका घेण्यात आल्या आहेत. केंद्र स्तरावर ही बैठक होणार होती. मात्र, कोरोनामुळे ही बैठक पुढे ढकलावी लागली आहे.

- संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)