शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या कामांबाबत बांधकाम हात झटकतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

जि.प.त निधीच्या नियोजनाचा खेळ बराच काळा सुरू राहतो. शिवाय नियोजन झाल्यावर त्याची प्रशासकीय मान्यता मिळताच निविदांपासून पुढची प्रक्रिया तर ...

जि.प.त निधीच्या नियोजनाचा खेळ बराच काळा सुरू राहतो. शिवाय नियोजन झाल्यावर त्याची प्रशासकीय मान्यता मिळताच निविदांपासून पुढची प्रक्रिया तर बांधकाम विभागालाच पार पाडावी लागते. मात्र, बांधकाम विभाग थेट त्यांच्या विभागाला मंजूर असलेल्या निधीपुरतेच पाहते. इतर विभागांची कामे त्यांच्याच देखरेखीखाली होतात. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातो. दरवर्षीचीच ही बोंब आहे, यामागे नेमका काय अर्थ दडला, हे कळायला मार्ग नाही. मात्र, यंदा ही बाब अंगलट आली. यावर बोट ठेवण्याचा प्रयत्न करीत या विभागाला तत्कालीन शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांनी कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यात जिल्ह्याचे नुकसान होत असल्याने इतरांनी त्यांना साथ दिली नाही. तर हा मुद्दा एवढा चिघळण्यास जबाबदार असलेला बांधकाम विभाग अजूनही नामानिराळाच आहे. त्यांना यात कसलीच झळ बसली नाही. परिणामी, आता काहींनी तर आपला टक्का वाढविला आहे. मार्च एण्डचा धाक दाखवून गुत्तेदारांना वेठीस धरले जात आहे. कार्यकारी अभियंत्यांच्या माघारीच हे कांड केले जात आहे. शेवटी हाती धुपाटणेच येण्याची भीती असल्याने गुत्तेदार सध्या तरी नरमाईची भूमिका घेत आहेत. मात्र, यावरून पुन्हा पदाधिकाऱ्यांकडे गदारोळ उठण्याची भीती आहे. काही गुत्तेदारांनी यात पंगा घेण्याची तयारी केली आहे. प्रकरण वेगळ्या मार्गाला गेले तर मोठ्या कारवाईचीही भीती आहे. त्यामुळे जि.प.त पदाधिकारी व सदस्यांत पेटलेल्या राजकारणात इतरांनाही चेव चढल्याचे दिसत आहे. जि.प.च्या इतिहासात पहिल्यांदाच असा पेच निर्माण झाला आहे. एकतर रस्त्यांची कामे करताना काही ठिकाणी अभियंतेच गुत्तेदारी करीत असल्याची बोंब यापूर्वी सदस्यांतून होत होती. त्यातून सुटले तर क्रशरच्या कचाट्यात घातले जाते. यावर पदाधिकारी काही मार्ग काढतात की रंग देतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. यामुळे पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण आदी विभागांच्या जवळपास १८ कोटींच्या कामांचे भिजत घोंगडे कायम आहे.

जि.प.चे नूतनीकरण किती वेळा होणार?

हिंगोली जि.प.च्या इमारतीच्या नूतनीकरणाचा घाट वारंवार घातला जातो. येथेच काम करणाऱ्या काही अभियंत्यांसाठी पदाधिकाऱ्यांसह काही सदस्यांनी निर्माण केलेले हे कुरणच आता कुंपण खायची भीती निर्माण झाली. ही इमारत जेवढ्या कोटींची नाही, त्याच्या दोन ते तीन पट खर्च दुरुस्ती व नूतनीकरणावर झाला आहे. अजूनही तीच ती कामे करण्याचा सपाटा सुरू आहे. कधी अधिकाऱ्यांचे तर कधी पदाधिकाऱ्यांचे दालन सजते. सहा महिन्यांत त्याला भेगा तरी पडतात नाही तर जागीच सडते.

लघुसिंचनच्या चौकशीची मागणी

जि.प. सदस्या यशोदा दराडे यांनी जि.प.च्या लघुसिंचन विभागाने केलेल्या खर्चाचे मापदंड व पाणीसाठा याची सक्षम तांत्रिक अधिकऱ्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. निवेदनात म्हटले की, लघुसिंचनचे कार्यकारी अभियंता चं.दा. वाघमारे हे जानेवारी २०१९ पासून रुजू झाले आहेत. त्यांच्या काळात झालेला प्रत्यक्ष खर्च व प्रत्यक्षात होणारा पाणीसाठा हा अंदाजपत्रकात नमूद केल्यापेक्षा खूप कमी आहे. सिमेंट बंधारे व पाझर तलावांची कामे करताना निकष पाळले नाहीत. कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्यांनी नियमात नसणारी कामे करून घेतल्याचा आरोपही केला. यावर जि.प. अध्यक्ष गणाजी बेले यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, असे आदेशित केले आहे. आधीच निविदेपूर्वीच काम केल्याचा प्रकार समोर आला असताना ही नवी तक्रार झाली आहे.