शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत उमेदवारांना चिंता ऑनलाईन खर्च सादरीकरणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:13 IST

हिंगोली : जिल्हाभरात ४९५ ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी रोजी लागला. निवडणुकीच्या धामधुमीतून मुक्त झालेल्या उमेदवार, पॅनलप्रमुखांना ...

हिंगोली : जिल्हाभरात ४९५ ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी रोजी लागला. निवडणुकीच्या धामधुमीतून मुक्त झालेल्या उमेदवार, पॅनलप्रमुखांना आता निवडणुकीत झालेला खर्च सादर करावा लागणार आहे. ऑनलाईन, ऑफलाईन खर्च सादर करण्याची मुभा असली तरी अनेक जण ऑनलाईन खर्च सादर करण्याला पसंती देत आहेत. मात्र नेटवर्कची अडचण उभी राहत आहे.

जिल्ह्यातील ४९५ ग्रामपंचायती पैकी ७३ ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या. त्यामुळे ४२२ ग्रामपंचायतीच्या ७ हजार ८६१ जागांसाठी निवडणूक झाली.

या निवडणुकीचा निकाल नुकताच हाती आला. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणुकीत झालेल्या खर्चाचा तपशील ३० दिवसांच्या आत सादर करावा लागणार आहे. गत निवडणुकीत झालेल्या खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्या जिल्ह्यातील २११ जणांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे पराभूत झालेल्या उमेदवारांसह निवडणून आलेले उमेदवार, पॅनलप्रमुख निवडणूक खर्च सादर करण्यासाठी धावपळ करताना दिसून येत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते निवडणून येईपर्यंत झालेल्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे.

असा सादर करावा लागतो निवडणूक खर्च

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना खर्च दाखल करणे अनिवार्य आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहीत नमुन्यात खर्च सादर करावा लागतो. यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते घरपट्टी, वाहनखर्च, बॅनर, स्टीकर, चहापाणी, पॉम्प्लेट आदी खर्चांचा समावेश असतो. यासाठी निवडणूक विभागाने ऑफलाईन व ऑनलाईन खर्च सादर करण्यास मूभा देण्यात आली आहे.

खर्च सादर करण्यास मोबाईल रेंजचा अडसर

ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना निवडणुकीत झालेला खर्च सादर करावा लागणार आहे. यासाठी ऑफलाईन सुविधा असली तरी अनेकजण ऑनलाईन खर्च सादर करण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र अनेक गावांत मोबाईल रेंजचा प्रश्न निर्माण होत आहे. उमेदवारी अर्ज सादर करतानाही रेंजचा प्रश्न निर्माण झाला होता. दोन दोन दिवस रेंजन राहत नसल्याने शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करावा लागला. आता रेंजचा प्रश्न निर्माण होत असल्याने निवडणूक खर्च सादर करताना उमेदवारांची दमछाक होताना दिसून येत आहे.

उमेदवारांपुढे अनेक अडचणी

निवडणुकीत झालेला खर्च ऑनलाईन सादर करण्याला प्राधान्य दिले असले तरी खर्च कसा सादर करावा, याबाबतचे प्रशिक्षण उमेदवारांना नसल्याने नेट कॅफे, ऑनलाईन सेंटरला जावावे लागत आहे. ऑनलाईन चालकांकडून जास्तीची रक्कम आकारली जात असल्याने नाहक भूर्दंड पडत आहे. त्यामुळेच अनेक जण निवडणूक खर्च सादर करण्याचे काम करणाऱ्या जाणकारांमार्फत ऑफलाईन खर्च सादर करत आहेत.