शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

हक्काबाबत ग्राहक जागृत झाल्याने कोरोना काळातही तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST

हिंगोली : आपल्या न्याय हक्कांसाठी प्रत्येकजण जागरूक झाला आहे. त्यामुळेच येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचात २०१९ च्या तुलनेत ...

हिंगोली : आपल्या न्याय हक्कांसाठी प्रत्येकजण जागरूक झाला आहे. त्यामुळेच येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचात २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये कोरोना आजार असूनही तक्रार दाखल करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होऊ नये, यासाठी आता प्रत्येकजण जागरूक झाला आहे. तरीही ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या किंवा ग्राहक सेेवेत त्रुटी देणाऱ्या विक्रेता, पुरवठादाराविरुद्ध जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे तक्रार दाखल करता येते. जिल्हा ग्राहक न्याय मंचात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ असल्याने व लवकर न्याय मिळत असल्याने ग्राहकांचा जिल्हा ग्राहक न्याय मंचावर विश्वास वाढला आहे. त्यामुळेच २०१९ मध्ये २३४ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यात पुन्हा भर पडत २०२० मध्ये ६४६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे २०२० मध्ये कोरोना आजारामुळे लॉकडाऊन असले तरीही ग्राहकांनी न्याय हक्कांसाठी घराबाहेर पडत जिल्हा ग्राहक न्याय मंचाची पायरी चढली. दरम्यान, २०१९ मध्ये ४३, तर २०२० मध्ये ३० तक्रारी निकाली काढण्यात जिल्हा ग्राहक न्याय मंचास यश आले आहे.

तक्रारी कशा स्वरूपाच्या होत्या

येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे सर्वच स्तरातील ग्राहकांनी न्याय हक्कांसाठी धाव घेतली आहे. वैयक्तिक तक्रारींसह काही गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये तक्रारींचा आकडा दुपटीपेक्षा अधिक वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे

तक्रारी नेमक्या काय?

१) येथील जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे ग्राहकांनी विविध तक्रारी दाखल केल्या आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत पीक विमा, बियाणे संदर्भातील तक्रारींचा समावेश आहे.

२) बँक, पतपेढी, एलआयसी, इन्शुरन्स या संदर्भातीलही तक्रारी जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे दाखल झाल्या आहेत. जिल्हा ग्राहक न्याय मंचात लवकर न्याय मिळत असल्यानेच तक्रारदार ग्राहकांची संख्या वाढत आहे.

प्रतिक्रिया

ग्राहक आपल्या न्याय हक्कांबाबत जागृत झाले आहेत. ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुलभ असून, निकाल लवकर लागतो. त्यामुळे ग्राहकांना ग्राहक मंच जवळचा वाटत आहे. २०२० मध्येही न्याय हक्कांसाठी ग्राहकांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली आहे. त्यांच्यात विश्वास वाढावा, न्याय लवकर मिळावा यासाठी ग्राहक मंचाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.

- जे. ए. सावळेश्वरकर, सदस्य, जिल्हा ग्राहक न्याय मंच