शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातून सावरलेल्या बालकांना 'एमएसआयसी' आजाराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

हिंगोली : कोरोनातून बरे झाल्यानंतर काही बालकांना एमएसआयसी (मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिड्रोम) चा धोका वाढला आहे. जिल्हा रुग्णालयात तीन ...

हिंगोली : कोरोनातून बरे झाल्यानंतर काही बालकांना एमएसआयसी (मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिड्रोम) चा धोका वाढला आहे. जिल्हा रुग्णालयात तीन बालकांवर उपचार करण्यात आले असून यातील दोन बालके बरे झाले, तर एका बालकावर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस कमी आढळून येत असले तरी कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभागाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यात १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण होत असले तरी १८ वर्षांखालील बालकांना अद्याप लस देणे सुरू झाले नाही. त्यामुळे लहान मुलांसाठी कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. त्यात कोरोना होऊन गेल्यानंतर तीन आठवडे ते एक महिन्यानंतर मुलांमध्ये एमएसआयसी (मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिड्रोम) या आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या एका बालकावर उपचार सुरू असून यापूर्वी दोन बालके बरे झाले आहेत, तसेच बाहेर जिल्ह्यात इतर चार बालकांनी उपचार घेतल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यात १०३९ बालकांना कोरोना

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १५ हजारांच्यावर आहे. यात १ हजार ३९ लहान बालकांचाही समावेश आहे. यात पहिल्या लाटेत ३३७, तर दुसऱ्या लाटेत ७०२ बालकांना कोरोना झाला. आता तिसरी लाट लहान बालकांसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.

ही घ्या काळजी

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच लहान मुलेही गर्दीच्या संपर्कात येणार नाहीत याची काळजी पालकांना घ्यावी लागणार आहे.

आरोग्याची काळजी घेताना लहान बालके नीटनेटके, स्वच्छ कसे राहतील याची काळजी घ्यावी.

-लहान बालकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी द्यावे, तसेच दैनंदिन सकस आहार द्यावा.

-घरातून बाहेर पडणाऱ्या घरातील व्यक्तींनी आपण स्वत: सुरक्षित राहिल्यास मुले सुरक्षित राहतील हे लक्षात ठेवून काळजी घ्यावी.

- काही लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या डॉक्टरांकडे दाखवावे.

बालरोग तज्ज्ञाचा कोट

लहान मुलांची रोग प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना दैनंदिन सकस आहार, पिण्यास शुद्ध पाणी देणे महत्त्वाचे आहे, तसेच

त्यांना गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळावे. आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवावे.

- डॉ. दीपक मोरे, बालरोग तज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली.

कोरोनाचे एकूण रुग्ण - १५९२८

कोरोनावर मात केलेले रुग्ण - १५५१०

जिल्ह्यात एकूण कोरोना मृत्यू - ३८१

उपचार घेत असलेले रुग्ण - ३७