शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली वगळता जिल्ह्यांत पावसाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST

औंढा येथे धूरफवारणी करण्याची मागणी औंढा नागनाथ : शहरातील अनेक वॉर्डांत मागील काही दिवसांपासून धूरफवारणी करण्यात आलेली नाही. ...

औंढा येथे धूरफवारणी करण्याची मागणी

औंढा नागनाथ : शहरातील अनेक वॉर्डांत मागील काही दिवसांपासून धूरफवारणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील संपूर्ण वॉर्डांत धूरफवारणी, अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली. परंतु, अद्यापही नगरपंचायतने लक्ष दिलेले नाही. वरिष्ठांची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

कनेरगावात कमी दाबाने वीजपुरवठा

कनेरगाव नाका: हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे गत पंधरा दिवसांपासून कमी दाबाने वीजपुरवठा सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने जास्त दाबाने वीजपुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे आहे. महावितरणच्या वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी वीजग्राहकांनी केली आहे.

औंढा बसस्थानकावर पाण्याचा अपव्यय

औंढा नागनाथ : मागील वीस-पंचवीस दिवसांपासून बसस्थानकासमोर पाण्याचा अपव्यय होताना दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाण्याची काळजी घेणे गरजेचे असताना कोणीच याकडे लक्ष देत नाही ही गंभीर बाब आहे. वरिष्ठांनी या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांना सूचना द्यावी, अशी मागणी होत आहे.

नाल्यांची साफसफाई करण्याची मागणी

कनेरगाव नाका : हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथील नाल्यांची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी हे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे घाण पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. ग्रामपंचायतीने या बाबीची दखल घेऊन नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

उसावर खोड किडीचा प्रादुर्भाव

हिंगोली : उसावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास औषधाची फवारणी करावी. हेक्टरी २ ते ३ ट्रायकोकार्ड दहा दिवसांच्या अंतराने ४ ते ६ वेळा वापरावे. तसेच क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिली किंवा क्लोरपायरिफॉस २० टक्के ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन ‘वनामकृ’ विद्यापीठाने केले आहे.

फळांवर रसशोष करणारी किडे

हिंगोली: आंबे, डाळिंबबागेत रसशोष करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. किडीचा नायनाट करण्यासाठी डायमिथोएट ३० टक्के ईसी १३ मिली किंवा इमिडाक्लोरप्रीड १७.८ टक्के ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हात फवारणी करणे टाळावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

‘भाजीपाला पिकांची काढणी लवकर करावी’

हिंगोली : जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्यांची लागवड केली आहे. भाजीपाल्यांवर अळीचा प्रादुर्भाव असल्यास उन्हात औषधाची फवारणी करू नये. काढणीस तयार असलेल्या भाजीपाल्याची काढणी ही सकाळी करून घ्यावी. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार सकाळी पाणी द्यावे, असे आवाहन कृषितज्ज्ञांनी केले आहे.