शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बेडवरुन उठताही येत नाही; लवकरच घरी येऊन दिली जाणार लस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:31 IST

हिंगोली: हायरिस्कमधील व्यक्तींना त्याच्या घरी जाऊन लस दिली जाणार आहे, असे शासनाने जाहीर केले असले तरी अजून तशी सूचना ...

हिंगोली: हायरिस्कमधील व्यक्तींना त्याच्या घरी जाऊन लस दिली जाणार आहे, असे शासनाने जाहीर केले असले तरी अजून तशी सूचना आलेली नाही, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

कॅन्सर रुग्ण, विकलांग, मधुमेह, किडनी आदी अतिगंभीर असलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन त्यास लसीकरण केले जाणार आहे, असे शासनाने सूचित केले आहे; परंतु तशी सूचना अद्याप आलेली नाही. जे रुग्ण चालू शकतात, अशांना आरोग्य विभागाने आयोजित केलेल्या कॅम्पच्या ठिकाणी येणे आवश्यक आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णासोबत आयोजित कॅम्पच्या ठिकाणी आले तरी चालेल. कॅम्पच्या ठिकाणी येतेवेळेस मास्क तोंडाला लावून येणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. शासन ज्याप्रमाणे सूचना देईल त्याप्रमाणे आरोग्य विभागाच्या वतीने व्यवस्था केली जाणार आहे.

बॉक्स, प्रतिक्रिया...

शाळा किंवा ग्रामपंचायतमध्ये केली जाईल व्यवस्था

रुग्ण जर अतिगंभीर असेल तरच त्याच्या घरी आरोग्य कर्मचाऱ्यास पाठविले जाणार आहे. जर रुग्णास चालता येत असेल तर त्याला लसीकरण केंद्रावरच यावे लागणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली शाळा किंवा ग्रामपंचायतीच्गा कार्यालयात लसीकरण कॅम्प आयोजित करुन लसीकरणाची व्यवस्था केली जाईल. यावेळी तज्ज्ञ डाॅक्टर, परिचारिका, आशाताई वर्कर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला जाणार आहे. तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांनी अतिगंभीर रुग्ण असेल तर त्याला घरीच ठेवावे. तपासणी करुनच लसीकरण करायचे की नाही, असे तज्ज्ञ ठरवतील, असेही सांगण्यात आले.

हायरिस्कमध्ये कोण?

कॅन्सर, विकलांग, किडनी, मधुमेह अशा रुग्णांच्या घरी जाऊन त्यास लसीकरण करण्यात येणार आहे. कारण अशा रुग्णाला इतरत्र जाणे सोयीचे नसते. हा निर्णय शासनाने घेतला असला तरी अजून तरी तशी गाईडलाईन आलेली नाही. यात विकलांगांना प्राधान्य देण्यात येऊ शकते.

गाईडलाईनप्रमाणे लसीकरण केले जाईल...

शासनाची जशी गाईडलाईन येईल त्याप्रमाणे जिल्ह्यातील अतिगंभीर रुग्णाच्या घरी जाऊन त्यास लसीकरण करण्यात येईल. घरी गेल्यानंतर त्याची तज्ज्ञ डाॅक्टरांमार्फत तपासणीही करण्यात येऊन लस दिली जाईल.

- डाॅ. प्रेमकुमार ठोंबरे, लसीकरण अधिकारी, हिंगोली