शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बसगाडी चक्क बनतेय ढकलगाडी

By admin | Updated: December 22, 2014 15:06 IST

जुनाट व मोडकळीस आलेल्या बसगाड्यांत होत असलेल्या नेहमीच्या बिघाडांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे दुर्लक्ष करीत सुरू असलेला राज्य परिवहन मंडळाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

गोरेगाव : /ग्रामीण /मार्गावर पाठविण्यात येणार्‍या जुनाट व मोडकळीस आलेल्या बसगाड्यांत होत असलेल्या नेहमीच्या बिघाडांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे दुर्लक्ष करीत सुरू असलेला राज्य परिवहन मंडळाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.सेनगाव तालुक्यातील गोरेगाव हे परिसरातील ५२ खेड्यांची बाजारपेठ संबोधल्या जात असून व्यवहारिकदृष्ट्या महत्वाचे स्थान आहे. जिल्हा, तालुक्याला व वाशिम, रिसोड आदी ठिकाणी जाण्यासाठी दळण वळणाच्या दृष्टीने परिसरातील गावासाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. असे असताना गावच्या दळणवळण सुविधेकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होत आहे.गोरेगाव मार्गावर हिंगोली आगाराच्या मोजक्याच बसफेर्‍या सुरू असून तालुक्यासाठी एकही बसफेरी नाही. विदर्भात जाण्यासाठीची पूर्ण भिस्त वाशिम-रिसोड आगाराच्या बस फेर्‍यांवर आहे. आधीच बसफेर्‍या कमी आणि त्यात पाठविण्यात येत असलेल्या बसगाड्या जुन्या व मोडकळीस आल्यामुळे वाहतूक सेवेचा बोजवारा उडत आहे. जुनाट मोडकळीस आलेल्या बसगाड्यांमध्ये सतत होत असलेल्या बिघाडांमुळे प्रवाशांना तासन्तास ताटकळत बसावे लागत आहे. अन्यथा खाजगी वाहनातून जिकिरीचा प्रवास करावा लागत आहे. संबधित या बाबीकडे दुर्लक्ष करीत परिवहन मंडळाच्या या कारभारामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. /(वार्ताहर)