शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! संक्रांतीच्या वाणातून कोरोना तर पसरत नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:27 IST

हिंगोली : मकर संक्रांत ते रथसप्तमी यादरम्यान महिला एकमेकींना वाणांची देवाण-घेवाण करतात. त्यानिमित्त महिला घराबाहेरही पडत आहेत; परंतु कोरोना ...

हिंगोली : मकर संक्रांत ते रथसप्तमी यादरम्यान महिला एकमेकींना वाणांची देवाण-घेवाण करतात. त्यानिमित्त महिला घराबाहेरही पडत आहेत; परंतु कोरोना आजाराचा धोका अजून कमी झालेला नाही, हे लक्षात घेऊन वाण देवाण-घेवाण करावी. वाणातून कोरोना तर पसरत नाही ना? अशी भीतीही महिलांतून व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे मकर संक्रांत हा सण महिलांनी यावर्षी साधेपणाने साजरा केला. मकर संक्रांतीचे वाण देवाण-घेवाण करण्याचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो. यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे बाजारपेठेत गर्दी करू नये, मास्कचा पुरेपर वापर करावा, सॅनिटायझरने हात धुवावे, सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी झालेले नाहीत. १४ जानेवारी रोजी १० पॉझिटिव्ह, १५ जानेवारी रोजी ६, १६ जानेवारी रोजी ७, १७ जानेवारी रोजी ९, १८ जानेवारी १२ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. तेव्हा संक्रांतीच्या वाणातून कोरोना तर पसरत नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकमेकांप्रती स्नेह व्यक्त करण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत होय. संक्रांतीचा हा गोडवा तीळगुळाच्या आदानप्रदानाने गोड होतो; परंतु यावर्षी कोरोनाचे संकट अजून तरी जिल्ह्यात कमी झालेले नाही. तेव्हा सामाजिक आंतर ठेवून सण, उत्सव साजरे करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लस आली तरी धोका कायम

वाणाला जात असताना किंवा वाण घेण्यासाठी घरात कोणी आले असताना तोंडाला मास्क लावायला विसरू नका. सोबत सॅनिटायझरही अवश्य ठेवा. लस आली म्हणून दुर्लक्ष करू नका. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे.

१४ जानेवारी पॉझिटिव्ह १० (मृत्यू नाही)

१५ जानेवारी ६ (मृत्यू नाही)

१६ जानेवारी ७ (मृत्यू नाही)

१७ जानेवारी रोजी ९ (मृत्यू नाही)

१८ जानेवारी रोजी १२ (मृत्यू नाही)