शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्र होणार एकसारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:27 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात एकजिनसीपणा व ...

हिंगोली : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात एकजिनसीपणा व सारखेपणा असण्यासाठी दर्शनी भाग सारखा रंगविण्यासाठी एक डिझाईन निश्चित करण्यात आली आहे. सर्व अंगणवाडी केंद्रांना सारखी रंगरंगोटी व बोलकी चित्रे काढण्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात हिंगोली तालुक्यातील खानापूर येथील अंगणवाडी केंद्राच्या रंगरंगोटीने झाली.

हिंगाेली जि. प. चे सीईओ शर्मा यांनी जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये झीरो पेंडसी व डेली डिस्पोजल ''संकल्प अभियान सुंदर कार्यालय अभियान, पेन्शन सेल, स्वच्छ कार्यालय अभियान, वृक्षारोपण अभियान यासारखे उपक्रम राबविण्यात आले. जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्राच्या भेटीदरम्यान वेगवेगळे रंग व काही ठिकाणी विना रंगरंगोटीच्या इमारती आढळल्याने त्यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात एकजिनसीपणा व सारखेपणा असण्यासाठी दर्शनी भाग सारखा रंगविण्यासाठी डिझाईनची निवड करून सर्व अंगणवाडी केंद्राना रंगरंगोटी करण्याच्या सूचना सर्व गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत.

यासाठी ग्रामपंचायतस्तरावरील १५ व्या वित्त आयोगातून महिला व बालकल्याण विभागासाठी राखीव असणारा १० टक्के निधीचा उपयोग ग्रामसेवक यांनी करण्याबाबत सूचना दिल्या.

या अभियानाची सुरुवात सीईओ शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बैठक घेऊन उपक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी अति. मुख्य कार्यकारी अधिकारी शेंगुलवार, धनवंतकुमार माळी, गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्ह्यातील सर्व पर्यवेक्षिकांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. गटविकास अधिकारी डाॅ. पोहरे, विस्तार अधिकारी भोजे यांनी खानापूर येथील अंगणवाडी केंद्राची इमारत रंगरंगोटी व बोलकी बनविण्यास सुरुवात करुन या अभियानाची सुरुवात केली. येत्या आठवड्यात जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांना रंगरंगोटी करण्याचे काम होणार आहे. या अभियानामुळे बालकांना रंगरंगोटी व बोलक्या अंगणवाडीची इमारती पाहून त्यांचा अंगणवाडीत येण्याचा उत्साह वाढणार आहे. फाेटाे नं. १६