शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विमा नसल्यामुळे ७४ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:20 IST

वाहन घेतले की त्याचा विमा काढणे हे वाहनासाठी तसेच वाहन मालकासाठी हे फायद्याचेच असते. काही जण काटकसर म्हणून ...

वाहन घेतले की त्याचा विमा काढणे हे वाहनासाठी तसेच वाहन मालकासाठी हे फायद्याचेच असते. काही जण काटकसर म्हणून जुनी वाहने त्रयस्त व्यक्तीकडून खरेदी करतात. त्याने विमा काढला की नाही याची खातरजमाही करत नाहीत. खरे पाहिले तर जुने वाहन खरेदीच करु नये. जर खरेदी केले तर त्या वाहन मालकाने विमा काढला आहे की नाही हेही पाहणे गरजेचे आहे.

वाहन जुने असो की नवे. लगेच त्याचा विमा काढून आपली सुरक्षितता आबाधीत ठेवावी. कोणती वेळ कधी सांगून येत नाही. स्वत: जोखीम पत्करु नये. सध्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. चैनीपोटी अनेक जण वाहने खरेदी करत आहेत अन्‌ लगेच विकूनही टाकत आहेत. अशावेळी अपघात झाल्यास आपल्याला मदत मिळणे अपेक्षित असते, परंतु, विमा नसल्यामुळे ते मिळणे कठीण होऊन बसते. वाहन खरेदी केले की, लगेच वाहनमालक व संबंधित वाहनाचा विमा काढणे आगत्याचे आहे. यासाठी अनेक वेळा उप प्रादेशिक कार्यालयाने जनजागृतीही केली आहे.

स्वत:च्या संरक्षणासाठी वाहनमालकाने सर्तकता बाळगून आणि पुढील भविष्यासाठी आपल्या वाहनाचा विमा उतरविणे आवश्यक आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत ट्रक, दुचाकी, कार, जीप अशा ७४ वाहनांवर नियमाप्रमाणेच कारवाई केली असल्याचे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.

विमा न काढणे फायद्याचेच ठरते

वाहन खरेदी करुन त्याचा विमा न काढणे हे योग्यच नाही. कारण वेळ कधी कुणाला सांगून येत नाही. अपघात झाल्यानंतर बऱ्याच वेळा आपण क्लेम करतो. नुकसान भरपाई मिळेल का? याची विचारणा करतो. तेव्हा मोठी अडचण निर्माण होते. विमा असेल तर आपल्याला क्लेम करता येतो आणि वाहनाची नुकसान भरपाई मिळू शकते.