शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीतही म्युकरमायकोसिसचे ८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:30 IST

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. ते आठही रुग्ण बरे झाले आहेत. त्यातील एक जण ...

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. ते आठही रुग्ण बरे झाले आहेत. त्यातील एक जण गंभीर असल्याने त्याला नांदेडला हलविण्यात आले होते, तर एकावर सर्जिकल डिब्राईटमेंटची पद्धती वापरावी लागली. तिघांना एम्पोटेरेसिन बी या इंजेक्शनचा फायदा झाला. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये साधारण २० ते २५ दिवसांनी म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे या काळात वेगळी काही लक्षणे आढळली तर रुग्णांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. हिंगोलीत जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात आलेल्या रुग्णांमधूनच हे रुग्ण आढळून आले असून, त्यांना ओरल ॲण्ड मॅक्झिलोफेसिएल सर्जन डॉ. फैसल खान यांच्याकडे रेफर केल्यानंतर हा प्रकार समोर आला होता. याबाबत डॉ. फैसल खान म्हणाले, आपल्याकडे आढळून आलेल्या आठ रुग्णांबाबत वरिष्ठांना अहवाल देण्यात आला आहे. या सर्व रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. अजूनही या रुग्णांवर आमची यंत्रणा लक्ष ठेवून आहे. कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचा धोका असलेल्यांनी २० दिवसांनी याबाबतची तपासणी करून घेतल्यास संभाव्य धोका टाळता येणार आहे.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

म्युकरमायकोसिस दुर्मीळ असला तरी नवा नाही. प्रतिकारशक्ती कमी असलेल्या, अतिदक्षता विभागात असलेल्या तसेच अवयव प्रत्यारोपण केल्या जाणाऱ्या रुग्णांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिस होणे तसेच त्यामुळे मृत्यू होणे, अशा गोष्टी पूर्वीपासूनच घडत आहेत. पण, कोविड १९मुळे त्याची लागण होत असल्याची गोष्ट नवी आणि धोकादायक आहे. कोविड-१९मधून चांगल्या पद्धतीने बरे होत असलेल्या रुग्णांना याची लागण होण्याचा वेग अचानक वाढला आह. ही बाब काळजीची आहे. हा आजार झायगोमायकोसिस म्हणूनही ओळखला जातो. मागील २० ते २५ दिवसांत दंतचिकित्सकांकडे कोरोनातून बरे झालेल्यांना म्युकरमायकोसिस होत असल्याचे आढळले आहे.

म्युकरमायकोसिस नावाच्या बुरशीमुळे या आजाराचा संसर्ग होतो. ती पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते. मात्र, जेव्हा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती क्षीण होते, तेव्हा तिचा संसर्ग शरीरात होतो. या बुरशीचा कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस तसेच सायनसवर त्याचा दुष्परिणाम होतो. खुल्या जखमेतूनही ही बुरशी शरीरात प्रवेश करते. म्युकरमायकोसिसची लागण संसर्गजन्य नाही. एकापासून दुसऱ्याला किंवा प्राण्यांपासून माणसाला होण्याची धोका नाही. योग्यवेळी निदान व बुरशीप्रतिकारक उपचार केल्यास रुग्ण बरा होतो.

यात तातडीने निदान केल्यास बुरशी प्रतिकारक उपचार पद्धती वापरता येते. पण, संसर्ग शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचल्यास शस्त्रक्रिया करावी लागू शकते. त्यामुळे उपचारास विलंब झाल्यास होणारी गुंतागुंत व दृष्टी जाण्याचा धोका आहे. नाक व जबड्यांच्या हाडावर दुष्परिणाम होतो. पंधरा दिवसांपर्यंत पोहोचल्यास मृत्यूचा धोकाही होऊ शकतो. त्यामुळे मधुमेह व इतर गंभीर आजार असलेल्यांनी एकदा तरी मुख आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही डॉ. खान यांनी केले.

म्युकरमायकोसिसचा धोका कोणाला ?

मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा असलेल्या रुग्णांना म्हणजे ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत आहे, अशांनाच या आजाराचा जास्त धोका आहे.

आजाराची लक्षणे कोणती?

तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, दातातून पू येणे, दात हलणे, जबड्याचे हाड उघडे पडणे, डोके दुखणे, सायनस रक्तसंचय, डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्यावर सूज येणे, सूज आलेल्या ठिकाणी त्वचा काळी पडणे, नाकात अडथळे होणे, नाकात काळे सुके मल तयार होणे आदी लक्षणे दिसून येतात.

कोविड १९ आणि म्युकरमायकोसिस

म्युकरमायकोसिस हा आजार मधुमेह असणारे रुग्ण, स्टेरॉईडवर असणारे रुग्ण यांच्यात कमी रोगप्रतिकारशक्तीमुळे होतो, तर कोविड १९ उपचार घेत असलेल्या रुग्णांना स्टेरॉईड्स आणि आणखी काही औषधी देण्यात येतात. जेणेकरून कोरोनातून या रुग्णांची सुटका होईल. मात्र, यामुळेच त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि म्युकरमायकोसिसचा धोका वाढतो.

म्युकरमायकोसिसचे निदान कसे करायचे?

सीटीस्कॅन, इंडोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने म्युकरमायकोसिसचे निदान करणे सोपे आहे. वरील लक्षणे आढळल्यास दंत अथवा मुख्य आरोग्य तज्ज्ञांकडून सल्ला घेणे आवश्यक आहे.