काेराेना आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसर १, कळमनुरी परिसरात २, सेनगांव परिसरात ४ व्यक्ती असे एकूण ७ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर काेविडमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच ३ रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी साेडण्यात आले आहे. सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या ३ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे़ एका रुग्णाची प्रकृती अतिगंभीर आहे. अशा एकूण ४ रुग्णांवर सद्य:स्थितीत उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत कोविडचे एकूण ३ हजार ४७१ रुग्ण झाले असून, त्यापैकी ३ हजार ३८८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण ३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविडमुळे जिल्ह्यात आतापर्यंत ५३ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी दिली आहे.