हिंगोली जिल्ह्यात आज हिंगोली ६१, वसमत १२, सेनगाव ७, कळमनुरी ४०, औंढा ७ अशा एकूण ११२ अँटिजन चाचण्या करण्यात आल्या. यापैकी एकही बाधित आढळला नाही, तर आरटीपीसीआर चाचणीत हिंगोलीच्या विद्यानगरातील १, रिसोड येथील १ तर कळमनुरीच्या मोहाळे काॅलनीतील एक बाधित आढळला. तसेच २ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यात नाईकनगर १ व प्रगतीनगरचा १ अशा दोघांना डिस्चार्ज दिला आहे. आजपर्यंत कोरोनाचे एकूण ३५३९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ३४३५ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ५० रुग्णांवर विविध कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वाॅर्डात दाखल असलेल्यांपैकी ७ जण ऑक्सिजनवर तर एक अतिगंभीर असल्याने बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहेत. आज कोरोनाने कळमनुरी येथील एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे नवे ३ रुग्ण, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:37 IST