शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

२६ बचत गटांना व्यवसायासाठी ३ टक्के व्याजाने १४ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST

या गटांना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडून आत्मनिर्भर भारत अभियानात बीज भांडवल योजना सुरू केली आहे. ...

या गटांना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडून आत्मनिर्भर भारत अभियानात बीज भांडवल योजना सुरू केली आहे. प्रति महिला ४० हजार अथवा बचत गटास ४ लाखांपर्यंतचे भांडवल देता येते. अनेक बचत गटांनी एकत्र आल्यास किंवा प्राेड्यूसर कंपनीस १० लाखांपर्यंतची रक्कम व्यवसाय, उद्योगासाठी मिळू शकते. यासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर करावे लागतात. पहिल्याच वर्षी जिल्ह्यातून औंढा १०२, वसमत ५, हिंगोली १४, कळमनुरी ११, सेनगाव २० असे १५२ प्रस्ताव गेले होते. यासाठी ७६.३८ लाखांच्या कर्जाची मागणी केली होती. मात्र राज्य कक्षाच्या छाननीत यातील औंढा २१, वसमत २, हिंगोली ४, सेनगाव ५ असे ३२ प्रस्तावच पात्र ठरले. यापैकी औंढ्यात १८ गटातील १८ जणांना ७.१८ लाख, वसमतच्या एका गटाला ४० हजार, हिंगोलीतील ३ गटांतील तिघांना १.१० लाख, सेनगावच्या ४ गटातील १३ जणांना ५.२० लाखांचे कर्ज मंजूर झाले आहे. यात ३५ ते ४० हजार रुपये बचत गट सदस्याच्या मागणीनुसार मंजूर झाले आहेत.

या गटांना कर्ज वितरण करताना ते प्रभाग संघ म्हणजे जि. प. गटावर सर्व बचत गटांचा मिळून स्थापन संघाला मिळेल. ते बचत गटाला देतील. तर गट त्या लाभार्थ्याच्या खात्यावर टाकेल. अशी तरतूद केली आहे.

फिरते भांडवल होईल जमा

यापुढे ही रक्कम शासनाकडे परत जाणार नाही. ही रक्कम पुन्हा त्याच मार्गाने ३ टक्के व्याजासह वर्षभरानंतर प्रभाग संघ अथवा जिल्हा संघाकडे येईल. यात व्याज मात्र बचत गटास एक टक्का, प्रभाग संघास एक टक्का तर जिल्हा संघास एक टक्का मिळेल. तर पुन्हा ही रक्कम याच भागातील इतर बचत गटांना दिली जाईल.