शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी व मुलीच्या धाडसाने वाचले तरुणाचे प्राण बिबट्याचा हल्ला : आरडा ओरड व हुसकावून लावल्याने काढला बिबट्याने पळ

By admin | Updated: June 25, 2016 23:03 IST

जळगाव : शेतात काम करीत असलेल्या साईिसंग बारकू पावरा (३५, रा. मालापूर, ता. चोपडा) या तरुण शेतकर्‍यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्यानंतर तेथे जवळच असलेल्या या शेतकर्‍याची पत्नी सुनीता व ११ वर्षीय मुलगी शिमला यांनी मोठे धाडस दाखवित या तरुणाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली.

जळगाव : शेतात काम करीत असलेल्या साईिसंग बारकू पावरा (३५, रा. मालापूर, ता. चोपडा) या तरुण शेतकर्‍यावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्यानंतर तेथे जवळच असलेल्या या शेतकर्‍याची पत्नी सुनीता व ११ वर्षीय मुलगी शिमला यांनी मोठे धाडस दाखवित या तरुणाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली.
चोपडा तालुक्यातील मालापूर नजीकच्या डोंगरपायथ्याशी असलेल्या आपल्या शेतात साईिसंग हा त्याची पत्नी व मुलीसह काम करीत असताना दबा धरुन बसलेल्या बिबट्याने साईिसंगवर झडप घेत जोरदार हल्ला केला. त्या ठिकाणाहून चार ते पाच फुटावरच त्याची पत्नी व मुलगीही काम करीत होते. हल्ला झाला असताना जवळपास कोणीही नाही, त्यामुळे काय करावे हे समजत नसल्याने क्षणाचाही विलंब न करता पत्नी सुनीता व मुलगी शिमला यांनी पुढे सरसावत मोठ्या धाडसाने या बिबट्याला आरडाओरड करून व त्याच्या दिशेने चालत जाऊन त्याला हुसकावून लावले. एवढ्या वेळात मात्र बिबट्याने साईिसंगच्या चेहर्‍यावर, हात, पोटावर हल्ला करीत गळ्याचा घोट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळीच पत्नी व मुलीने धाडस दाखविल्याने साईिसंगची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. तरीदेखील त्याच्या गळ्याजवळ जखम झाली आहे.

जिल्हा रुग्णालयात उपचार....
घटनेनंतर पत्नी व मुलगी त्याला शेतातून घरी आणत होते. त्यावेळी जवळच एक दुचाकीस्वार भेटल्याने दुचाकीवर त्याला मालापूर येथे घरी नेण्यात आले व तेथून चोपडा येथे हलविण्यात आले. मात्र हल्ला गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार या शेतकर्‍याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन येथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. बिबट्याने तरुणाच्या चेहर्‍यावर एवढा जबर चावा घेतला आहे की, चेहर्‍यावर प˜ी बांधूनही रक्त वाहणे सुरूच होते.