शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

मोबाईल डेटा वाचवायचाय?- TRY THIS

By admin | Updated: May 17, 2017 17:42 IST

मोबाईल डेटा वाचवा, पैसे वाचवा, आॅनलाइन फ्री रहा!

- निनाद महाजनमोबाईल डेटा कुठंं उडतो हे अनेकदा कळतच नाही. आपण मारतोय रिचार्जवर रिचार्ज पण डेटा गायब. आपला डेटा नक्की जातोय कुठं? फॉरवर्डच्या खेळात. तो तर जातोच. म्हणजे आपण फॉरवर्ड मारावेत म्हणून कसलेही पुचाट जोक मार्केटमध्ये ओतले जातात आणि आपण हिरिरीने ते फॉरवर्ड करतो. त्यात आपला डेटा जाळतो. घरबसल्या आपला डेटा जाळू नका, त्यापेक्षा जरा डोकं वापरा. डेटा वाचवा आणि आपले पैसेही! ते कसे वाचवता येतील? त्यासाठीच्या या काही एकदम साध्या टिप्स. पण करुन पहा. डेटा वाचेल.

१) वायफाय आहे काय?एकतर तुमचा मोबाईल डेटा वापर मोठा असेल, मोठी कामं तुम्ही आॅनलाइन करत असाल तर घरी वायफाय घ्या. त्यानं बरेच पैसे वाचतील. आणि त्याहून मोठी न लाजता करायची गोष्ट म्हणजे कुणाच्याही घरी गेलं आणि त्यांच्याकडे वायफाय असेल तर न लाजता पासवर्ड मागा. तेवढ्यातल्या तेवढ्यात ते वापरुन आपले अ‍ॅप्स आणि इतर सॉफ्टवेअर अपडेट करुन घ्या. त्यापायी खर्च होणारा आपला डेटा वाचवा.२) डेटा मॉनिटरआपल्या फोनच्या सेटिंगमध्ये जावून बघा. एक डेटा मॉनिटर असतो. आपण कधी, कशासाठी, किती डेटा वापरतो आहोत याची माहिती तो देतो. त्यावर लक्ष ठेवा. अधुनमधुन तो चेक करा. आपला अनावश्यक वापर कशावर होतो ते तुमचं तुम्हाला कळेल. तो वापर बंद करा.३) आॅटो डाऊनलोड बंदआपल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंंगमध्ये जावून आॅटो डाऊनलोड हा आॅप्शन बंद करा. म्हणजे फक्त वायफाय असेल तरच आपल्याला आले सारे फोटो आॅटो डाऊनलोड होतात. डेटा पॅक सुरु असेल आणि आपण फोटो डाऊनलोडवर क्लिक केलं नाही तर फोटो स्वत:हून डाऊनलोड होत नाही. त्यानं आपला डेटा वाचतो आणि मोबाईलमधली जागाही.४)  डिसेबल पुश कनेक्ट

आपल्याला कळतही नाही, आणि नको त्या गोष्टी आॅटो डाऊनलोड होत राहतात. त्या टाळायच्या तर डिशेबल पुश कनेक्ट बंद करुन टाका. विशेषत: फेसबुक फोनवर वापरताना हे कराच.फेसबुकच्या सेटिंगमध्ये जा, अकाऊण्ट सेटिंगमध्ये जावून डेटा मेन्यू चेक करा. तिथं हा आॅप्शन मिळेल. तो बंद करा.५) फॉरवर्ड खेळ थांबवाआपल्याला काय वाटतं आलं फॉरवर्ड फुकट आहे? तसं नाही. आलं फॉरवर्ड डाऊनलोड करुन पाहिलंच पाहिजे का? विचारा स्वत:ला. नको ते म्युझिक व्हिडिओ, नको ते फोटो डाऊनलोड करू नका. केले तरी पुढं पाठवू नका. त्यानं आपला डेटा निम्म्यानं वाचेल.