शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
3
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
4
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
5
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
6
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
7
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
8
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
9
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
10
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
11
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
12
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
13
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
14
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
15
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
16
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
17
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
18
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
20
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
Daily Top 2Weekly Top 5

समजून घ्या ‘कोरोना’; फक्त ३ मिनिटे चाला अन् चाचणी करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:15 IST

या स्टेजमध्ये रुग्ण व डॉक्टरच्या हे लक्षात आले तर लवकर उपचार सुरु करून रुग्णाचा जीव वाचू शकतो. यासाठी ‘सायलेंट हायपोक्सिया’ची प्रक्रिया शरीरात सुरु झाली आहे, हे तपासण्याचा एक मार्ग म्हणजे ३ मिनिट वॉक टेस्ट.

अमोल अन्नदातेकोरोनाचा संसर्ग झाल्यावर ‘सायलेंट हायपॉक्सिया’ म्हणजेच कुठल्याही लक्षणांशिवाय शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे, हे एक घातक लक्षण आहे. बरेचदा कोरोना संसर्गित झालेल्या व्यक्तीने पल्सऑक्सिमीटरने ऑक्सिजनची पातळी तपासली तर त्यावर सुरुवातीला हे लक्षात येत नाही. म्हणजे शरीरातील ऑक्सिजन अजून कमी झालेले नसते, पण फुप्फुसांवर कोरोनाचा परिणाम सुरु झालेला असतो. म्हणजेच ऑक्सिजनची पातळी कमी होण्यासाठी आजार वाढण्याची प्रक्रिया वेगाने सुरु झालेली असते. या स्टेजमध्ये रुग्ण व डॉक्टरच्या हे लक्षात आले तर लवकर उपचार सुरु करून रुग्णाचा जीव वाचू शकतो. यासाठी ‘सायलेंट हायपोक्सिया’ची प्रक्रिया शरीरात सुरु झाली आहे, हे तपासण्याचा एक मार्ग म्हणजे ३ मिनिट वॉक टेस्ट.

३ मिनिट वॉक टेस्ट कशी करावी?

  • चालण्याअगोदर १० ते १५ मिनिटे शांत बसून राहावे व पल्स आॅक्सिमीटरने शरीरातील आॅक्सिजनची पातळी आधी तपासावी. त्यानंतर टायमर लावून नॉर्मल वेगाने ३ मिनिटे चालावे. त्यानंतर परत आॅक्सिजनची पातळी मोजावी. चालण्याआधी व चालण्यानंतर आॅक्सिजनच्या पातळीमध्ये ३ ते ४ चा फरक असला किंवा ते ९४ च्या खाली असेल तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा. असे असेल तर पुढील २४ तासांत आॅक्सिजनची पातळी अजून खाली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन ही धोक्याची घंटा समजावी.
  • ३ मिनिट वॉक टेस्ट कोणी करावी?
  • कोरोना संसर्ग झालेले
  • लक्षणविरहीत रुग्ण
  • सौम्य तसेच मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले
  • होम आयसोलेशनमध्ये असलेले
  • कोरोना चाचणीसाठी स्वॅब दिला आहे पण अजून अहवाल आलेला नाही.
  • कोणी करण्याची गरज नाही ?
  • संपर्कात आलेले व क्वारंटाइनमध्ये असलेल्यांनी तसेच इतर कोणाचा संपर्क नसलेल्या सर्व सामन्यांनी नियमित ही टेस्ट करू नये.
  • ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी लगेच घाबरून जाऊ नये, कारण लवकर निदान झाल्याने पुढे बरेच उपचार करता येतात.
  • ३ मिनिट वॉक टेस्ट पॉझिटिव्ह पण कोरोनामुळे आॅक्सिजन घटल्याने नव्हे; तर इतर काही कारणे आहेत-
  • शरीरात हिमोग्लोबिन कमी असणे (अ‍ॅनिमिया), फुप्फुस आधीपासून आकसलेले असणे (फायब्रोसिस ), तीव्र स्वरूपाचा हृदयरोग.

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या