शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

TIPS : घर बसल्या तपासा खाद्यपदार्थांमधील ‘भेसळ’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 18:48 IST

दैनंदिन आयुष्यात आपण बऱ्याच वस्तू बाजारातून विकत घेतो, मात्र बऱ्याचदा त्या वस्तूंमध्ये भेसळ केली जाते. ती आपल्याला ओळखता येत नाही, आणि त्याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो

-Ravindra Moreदैनंदिन आयुष्यात आपण बऱ्याच वस्तू बाजारातून विकत घेतो, मात्र बऱ्याचदा त्या वस्तूंमध्ये भेसळ केली जाते. ती आपल्याला ओळखता येत नाही, आणि त्याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. आज आम्ही आपणास वस्तूंमधील भेसळ कशी ओळखावी याबाबत काही टिप्स देत आहोत. दुधदुधातील भेसळीच्या अनेक घटना ठिकठिकाणी घडत असतात. दुधात डिटर्जंट मिसळलं जातं किंवा दुधाच्या नावावर काही जण सिंथेटिक मिल्कही विकतात. ही भेसळ जीवावरही बेतू शकते. म्हणूनच ती ओळखणं अत्यंत गरजेचं आहे.१० मिली. दूध तितक्याच पाण्यात एकत्र करा. त्यात फेस झाल्यास ती डिटर्जेंटची भेसळ आहे. तर, सिंथेटिक दूध चवीला वाईट असतं आणि ते उकळवताना त्याला फिक्कट पिवळा रंग येतो.लाल तिखटरोज भाजी-आमटीला फोडणी देताना वापरल्या जाणाऱ्या लाल तिखटात विटेचा चुरा किंवा मीठ मिसळलं जातं. ही भेसळ ओळखणं अगदीच सोपं आहे. एक चमचाभर लाल तिखट ग्लासभर पाण्यात एकत्र करा. हे पाणी जर रंगीत झालं तर त्यात भेसळ आहे, असं समजा.पनीरपनीरची भाजी आपण अगदी चवीनं, बोटं चाटून-पुसून खातो. पण या पनीरमध्ये स्टार्च मिसळून डेअरीवाले आपल्याला उल्लू बनवू शकतात. अशावेळी, पनीर घरी आणल्यानंतर ते थोड्याशा पाण्यात घालून उकळावं आणि थंड झाल्यावर त्यावर आयोडीन सोल्युशनचे काही थेंब टाकून त्याचा रंग तपासावा. पनीर जर निळं झालं, तर ते टाकून द्यावं किंवा दुकानात नेऊन ह्यसाभारह्ण परत करावं.• मधआपल्याकडचा मध शुद्ध आहे की नाही, हे तपासून पाहायचं असेल, तर कापसाची वात त्यात भिजवून पेटवून पाहावी. ती जर तेवत राहिली तर मध शुद्ध आहे. भेसळयुक्त मधात भिजवलेली वात सहजासहजी जळत नाही. ती तडतडते.• खोबरेल तेलखोबरेल तेलात बऱ्याचदा इतर तेलं मिसळून ग्राहकांची फसवणूक केली जाते. ही भेसळ ओळखण्यासाठी खोबरेल तेलाची छोटी डबी फ्रीजमध्ये ठेवावी. जे गोठेल ते खोब?्याचं तेल आणि बाकीची भेसळ.• धने पावडरआपल्या जेवणाला चव यावी आणि पोटदुखी वगैरे होऊ नये, म्हणून आपण धने पावडर आवर्जून वापरतो. पण त्यात लाकडाचा भुसा असेल तर? घाबरू नका. थोड्याशा पाण्यात धने पावडर शिंपडा. भुसा असेल तर तो पाण्यावर तरंगेल आणि आपल्या शंकेचं निरसन होईल.• जिरंजिऱ्यातिल भेसळ ओळखायची असेल, तर थोडंसं जिरं तळहातावर घेऊन ते चोळावं. जर जिरं काळ पडलं तर ते भेसळीचे चिन्ह आहे.• काळी मिरीभेसळयुक्त काळी मिरी खूप चमकते आणि त्याला हलकासा रॉकेलसारखा वास येतो.• सफरचंद'अ‍ॅन अ‍ॅपल ए डे, किप्स डॉक्टर अवे', हे जरी खरं असलं तरी आपण जे चकचकीत सफरचंद खातोय त्याला मेणाने पॉलिश तर केलेलं नाही ना, हे पाहणं आजकाल अत्यावश्यक झालंय. त्यासाठी इतकंच करा की, ब्लेड किंवा पातळ सुरी हलकेच फळाच्या सालावरून फिरवा. पांढऱ्या रंगाचा काही पदार्थ ब्लेड-सुरीला चिकटला तर ते मेण असेल. असं सफरचंद सालं काढून खा किंवा फळवाल्याला परत करून टाका.• हळदआपलं रोजचं जेवण हळदीशिवाय होऊच शकत नाही. पण या हळदीत जर मेटानिल येलो हा घटक असेल तर तो कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो. म्हणूनच हळद तपासून घेतलेली बरी. हळद पावडरमध्ये पाच थेंब हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आणि पाच थेंब पाणी घालावं. त्याला जर वांग्याचा रंग आला, तर ही हळद कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते.• हळकुंडकाही जण हळकुंड आणून, ती कुटून घरीच हळद पावडर तयार करतात. अशावेळी, हळकुंड पॉलिश केलेली नाहीत ना, हे तपासणंही सोपं आहे. एका कागदावर हळकुंड ठेवून त्यावर थंड पाणी ओतावं. हळकुंडाचा रंग गेल्यास ते पॉलिश केलेलं आहे, हे सहज कळू शकेल.• दालचिनीदालचिनी असली की नकली हे ओळखणंही कठीण नाही. दालचिनी हातावर रगडल्यानंतर जर तुमच्या हाताला रंग लागला, तर ती अस्सल दालचिनी समजावी.• फ्रोजन मटारसध्या फ्रोजन मटारची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. ते स्वस्तही पडतात आणि टिकतातही खूप. पण त्यात मेलाकाइट ग्रीन या घटकाचा समावेश असल्यासं पोटाशी संबंधित काही विकार होऊ शकतो. म्हणून आपण खरेदी केलेल्या मटाराचे थोडे दाणे थोड्याशा पाण्यात घालून ते ढवळावे. साधारण अर्ध्या तासानंतर त्याचा रंग पाहावा. पाणी रंगीत झालं, तर हे मटार न खाणंच श्रेयस्कर.• चहा पावडरचहा पावडरमध्ये वापरलेली चहा पावडर बेमालूमपणे मिसळली जाते किंवा अन्यही भेसळ होते. चहापत्ती थंड पाण्यात घातल्यानंतर रंग सोडत असेल तर त्यात भेसळ आहे, हे निश्चित!