स्वाईन फ्लू- भाग १
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
सहा वर्षांर्ंपासून मनपा कुंभकर्णी झोपेत- स्वाईन फ्लू कसा रोखणार ? : २००९ पासून उपाय योजलेच नाहीत नागपूर : उपराजधानीत स्वाईन फ्लूचा प्रकोप आजच एकाएकी वाढला नाही. आजच रुग्ण आढळून आले असेही नाही. नागपुरात २००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. परंतु सहा वर्षानंतरही स्वाईन फ्लूचा रुग्ण भरती करून ...
स्वाईन फ्लू- भाग १
सहा वर्षांर्ंपासून मनपा कुंभकर्णी झोपेत- स्वाईन फ्लू कसा रोखणार ? : २००९ पासून उपाय योजलेच नाहीत नागपूर : उपराजधानीत स्वाईन फ्लूचा प्रकोप आजच एकाएकी वाढला नाही. आजच रुग्ण आढळून आले असेही नाही. नागपुरात २००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. परंतु सहा वर्षानंतरही स्वाईन फ्लूचा रुग्ण भरती करून त्यावर उपचार करणारी यंत्रणा महापालिकेने उभी केलेली नाही. आलेले रुग्ण मेडिकल, मेयोकडे ढकलण्यापलिकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दुसरे काहीच केलेले नाही. महापालिकेची ही उदासीनता आज अनेकांच्या जीवावर उठली आहे. महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टनुसार प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बालकांसाठी आवश्यक सेवा देणे व गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु या जबाबदारीचा संपूर्ण विसर मनपाला पडलेला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती प्राप्त झाली आहे. शहराची लोक संख्या ३० लाखाच्यावर गेली असताना महापालिका फक्त तीन रुग्णालयांतून आरोग्य सेवा देत आहे. त्यांच्या मदतीला ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि युनानीचे असे एकूण २९ बाह्यरुग्ण विभाग आहेत. असे असतानाही मागील तीन वर्षात ७० हजार ७०० रुग्णांची तपासणी करण्यात आली तर यातील फक्त २६५९ रुग्णांना भरती करून घेण्यात आले. महापालिकेच्या इंदिरा गांधी रु ग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात एका दिवशी सरासरी ६५ ते ७० रु ग्णांची तपासणी केली जाते. यावरून मनपामध्ये आरोग्यकारक परिस्थितीचा अभाव व जोडीला आरोग्य सेवांची भीषण दूरवस्था व विषमता दिसून येते. चौकट...- नमुने घेण्याची सोयही नाहीस्वाईन फ्लूच्या संशयित रुग्णांवर उपचारासोबत त्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविणे महत्त्वाचे असते. परंतु महापालिकेचा आरोग्य विभाग संशयित रुग्णाचे नमुनेही घेत नाही. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातच(मेयो) संशयित रुग्णाला पाठविले जाते. महापालिका प्रयोगशाळा उभारू शकत नसली तरी संशयित रुग्णाचे नमुने तर घेऊ शकते, असा नाराजीचा सूर मेडिकल, मेयोच्या डॉक्टरांमध्ये उमटत आहे.