शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

राणी मुखर्जीसारखं यो यो डाएट करताय? मग तब्येत सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 16:39 IST

राणी मुखर्जी यो यो डाएटवर असल्याची चर्चा रंगली, पण हे डाएट नेमकं काय असतं? ते करावं का?

ठळक मुद्देआपल्या शरीराचं एक निसर्गचक्र असतं, ते बिघडवलं तर शरीर आपलं का ऐकेल?

-नितांत महाजन

यो यो डाएट नावाचं काही डाएट असतं हे आपल्याला माहित असण्याचं एरव्ही काय कारण होतं, पण अलिकडे चर्चा होती की राणी मुखर्जी यो यो डाएटवर होती, तिचं वजन कमी झालं होतं, आता वाढलं. अर्थात अशा गॉसिपला फार महत्व देवू नये, पण हे यो यो डाएट मात्र जगभर गंभीर विषय आहे. आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी ऑनलाइनही बरीच चर्चा होताना दिसते.तर यो यो डाएट म्हणजे काय? केली. डी. ब्राऊनेल या येल विद्यापीठातील डॉक्टरने ही संकल्पना मांडली. म्हणजे असं डाएट की, सुरुवातीला खूप कडक डाएट करायचं. अन्नत्यागच करायचा. क्रॅश डाएट. इतकं की खाणं बंद. त्यातून झरझर वजन कमी करायचं. असं वजन सुरुवातीला दणक्यात कमी होतं. पण मानवी शरीराचं एक चक्र असतं. वजनाचंही असतं. ते चक्र आपण तोडतो. एकदम अन्नच नाकारतो. खाण्याचा दुस्वास करतो. शरीर तग धरतं. वजन कमी होतं. पण काही दिवसांनी तेवढं क्रॅश डाएट करणं शक्य नसतं. भूक लागते. अन्न दिसू लागतं. थोडं थोडं म्हणत खाणं सुरु होतं. परिणाम म्हणून वजन वेगानं वाढतं. आणि कमी झालेल्या वजनापेक्षा जास्त वजन वाढतं.वजन असं वेगानं घटलं किंवा वाढलं तर त्याचा परिणाम ह्दयावर होतो. रक्तदाबावर होतो. हार्मोन्सवर होतो. आणि शरीराचं चक्र आपण पार बिघडवून टाकतो.त्यामुळेच अनेक तज्ज्ञ सांगतात की, असं यो यो डाएट करू नका.अनेक तरुण मुली, विशेषतर्‍ मॉडेल्स असं डाएट करतात. खाणं एकदमच बंद करुन टाकतात. त्यानं वजन कमी होतंही पण आपलं पचन कायमचं बिघडतं. आपल्या पचनशक्तीवर परिणाम होवून शरीरात योग्य आवश्यक स्त्राव स्त्रवणं कमी होतं.मूड बदलतो. अनेकदा चिडचिड होते. भूक लागल्यानं अनेकांना डोकेदुखी सतावते. लक्ष लागत नाही. एकाग्रतेवर परिणाम होतो. हे सारं टाळायचं तर आपल्या फिटनेसचा विचार करायला हवा. नुस्तं वजन कमी करुन, क्रॅश डाएट करुन काहीही उपयोग नाही.