शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

माईण्डफुलनेस मेडिटेशन करा, एकाग्रता आणि सर्जनशिलता वाढेल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 15:46 IST

आपण एक काम करतो, पण डोक्यात हजारो विचार. जे काम करतो तिथंच चित्त एकाग्र होणं कसं जमावं?

ठळक मुद्देआपण जे करतो, त्यात सजगता आवश्यक आहे. ते कौशल्य शिकून घ्यायला हवं

 . 

-डॉ. यश वेलणकर

आपण मुलांना सूचना देताना  ध्यान देऊन ऐका असे सांगतो. पण म्हणजे नेमके काय? ध्यान देणे, लक्ष देणे नेमके काय असते. कशानं हे लक्ष वाढेल, आपण लक्षपूर्वक काम करू. वर्तमानात रहायला शिकू. आणि कशामुळे आपली एकाग्रता वाढून आपण जे करतो त्या कामाचा आनंद घेता येईल? या प्रश्नांचं उत्तर म्हणजे हे ध्यान देणे म्हणजेच लक्ष देणे दोन प्रकारचे असते. 

1)एकाग्रता-

जे काही आपण पाहत,ऐकत, वाचत असू त्यावेळी मनात अन्य कोणतेही विचार येऊ न देता त्या कृतीवर पूर्ण एकाग्र म्हणजे एक अग्र होणे. कोणतेही लक्ष्य टिपायचे असेल तर एकाग्रता खूप महत्त्वाची असते. महाभारतातील अर्जुन थोर धनुर्धर झाला कारण त्याने नेम धरला की त्याला फक्त पक्ष्याचा डोळाच दिसत असे. अशी एकाग्रता सरावाने येते. असा मेंदूला दिलेला सराव म्हणजेच एकाग्रता ध्यान, फोकस्ड मेडिटेशन होय. आवाज, दृश्य, श्वासाचा स्पर्श किंवा एक विचार असे कोणतेही एक आलंबन ठरवायचे आणि त्यावर दीर्घकाळ मन एकाग्र करायचे. म्हणजे ते आलंबन सोडून मनात अन्य विचार आले तरी त्या कडे दुर्लक्ष करून मन पुनर्‍पुन्हा आलंबनावर न्यायचे।असा नियमित सराव केल्याने मेंदूतील अटेन्शन सेंटर अधिक सक्रिय होते,त्यामुळे एकाग्रता वाढते.विद्यार्थी, खेळाडू यांच्यासाठी हे कौशल्य खूप महत्वाचे आहे. शरीर सुदृढ आणि  निरोगी ठेवण्यासाठी रोज शारीरिक व्यायाम करायला हवा तसाच एकाग्रता वाढवण्यासाठी रोज मेंदूच्या या व्यायामासाठी किमान पाच मिनिटे द्यायला हवीत।मात्न शरीराचा रोज एकाच स्नायूचा व्यायाम केला तर शरीर बेढब दिसू लागते कारण शरीराचा समतोल साधला जात नाही. मेंदूचेही तसेच आहे. केवळ एकाग्रता वाढवण्यासाठी प्रयत्न केले तर त्याचे काही दुष्परिणाम होतात. नेहमी फक्त फोकस्ड मेडिटेशन केले असता एकाग्रता वाढते पण सर्जनशीलता कमी होते असे आधुनिक संशोधनात आढळत आहे.सर्जनशीलतेसाठी काहीतरी नवीन सुचणे, एखादा वेगळा विचार मनात येणे गरजेचे असते. एकाग्रतेचा सराव करताना मनात येणारे अन्य विचार आपण खुडून टाकत असतो, त्यावेळचे तेच ध्येय असते. पण सतत असेच करीत राहीलो तर नवीन,वेगळे विचार मनात येणे कमी होते, जे सर्जनशील कलाकारांना मारक आहेत. कवीला, लेखकाला, चित्रकाराला, उद्योजकाला नाविन्यपूर्ण कल्पना सुचाव्या लागतात. त्यासाठी एकाग्रता पुरेशी नसते, समग्रता आणि सजगता आवश्यक असते. ती विकिसत करण्यासाठी सजगता ध्यान करायला हवं. त्यालाच माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणतात. 

2)सजगता

हा लक्ष देण्याचा दुसरा प्रकार आहे. हे करताना कोणत्याही एकाच आलंबनावर लक्ष केंद्रित न करता त्याक्षणी शरीरात, मनात आणि  परिसरात जे काही घडते आहे ते जाणत राहणे. असे करताना आपण विचारांना थांबवत नाही पण त्यांच्यात गुंतून ही जात नाही. आपण विचारांकडे तटस्थपणे, साक्षीभावाने पहात असतो. असे पाहता येणे हे कौशल्य आहे आणि ते ही सरावाने वाढवता येते. हा सराव म्हणजेच सजगता ध्यान, तो ही मेंदूचा एक व्यायाम आहे।लहान मुलांना हे दोन्ही व्यायाम शिकवले आणि  त्यांना त्याची गोडी निर्माण झाली की त्यांची एकाग्रता आणि  सर्जनशीलता दोन्ही वाढतात असे जगभरात दिसून येत आहे।