शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालय सलाईनवर रुग्णांचे हाल : पुरेशा खाटांअभावी उपचारांसंबंधी अडचणी

By admin | Updated: March 11, 2016 00:27 IST

जळगाव- जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांचे हव्या त्या सुविधांअभावी हाल होत आहेत. काही वार्डांचा तर कोंडवाडा झाला आहे. काही रुग्णांना तर खाटांअभावी खाली झोपून राहावे लागले. महिला व प्रसूती कक्षात स्थिती बिकट आहे. आपत्कालीन कक्षातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

जळगाव- जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांचे हव्या त्या सुविधांअभावी हाल होत आहेत. काही वार्डांचा तर कोंडवाडा झाला आहे. काही रुग्णांना तर खाटांअभावी खाली झोपून राहावे लागले. महिला व प्रसूती कक्षात स्थिती बिकट आहे. आपत्कालीन कक्षातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.

जिल्हा रुग्णालयातील विविध वार्डांमध्ये सर्वेक्षण केले असता अनेक गंभीर व धक्कादायक बाबी समोर आल्या.
आपतकालीन कक्ष
आपतकालीन कक्षात १४ खाटा आहेत. सर्वच खाटांवर रुग्ण होते. त्यातच एक गंभीर महिला उपचारांसंबंधी आली. तिला कुठल्या खाटेवर टाकावे हा प्रश्न वैद्यकीय तज्ज्ञांसमोर होता. काही वेळ या महिलेला स्ट्रेचरवर तसेच ठेवण्यात आले. नंतर वैद्यकीय तज्ज्ञांनी तिला महिला कक्षात पाठविण्याचा निर्णय घेतला. आपतकालीन कक्षात पुरेशा खाटा नसल्याने अनेकदा रुग्णाला दाखल करून घेता येत नाही. रुग्णांच्या नातेवाइकांनाही जागा नसते. ते वार्डातच खाटांवर बसलेले दिसले.

महिला कक्षात दोन रुग्णांची हेळसांड
नवीन इमारतीमध्ये प्रसूती व महिला कक्ष आहे. या कक्षात ३२ खाटा आहेत. सर्वच खाटांवर रुग्ण होत्या. त्यात दोन महिलांना खाटा नसल्याने त्यांना या कक्षानजीक लिफ्टसमोर बसविले होते. त्या विव्हळत होत्या. तशातच रुग्णांचे नातेवाईक व्हरांड्यात गर्दी करीत होते. सध्या उष्णता असल्याने रुग्णांचा त्रास अधिकच वाढल्याचे दिसून आले.

पुरूष शल्य कक्षात दुर्गंधी, रिकाम्या खाटा
जुन्या इमारतीमध्ये पुरुष शल्य कक्ष आहेत. यातील पहिल्या कक्षात तीन खाटा रिकाम्या दिसल्या. परंतु बेडशीट, पडदे स्वच्छ नसल्याने दुर्गंधी येत होती. दुसर्‍या कक्षातही चार खाटा रिकाम्या होत्या. कक्ष स्वच्छ होता. पण या कक्षातही दुर्गंधीचे वातावरण होते. रुग्णांचे नातेवाईक खाटांवर बसलेले दिसून आले.

जनरल वार्डातही रिकाम्या खाटा
खालच्या मजल्यावर जनरल वार्डात सात खाटा रिकाम्या होत्या. रुग्णांची हेळसांड होत नव्हती, परंतु अस्वच्छतेची समस्या या वार्डातही होती. काही सिस्टर उपचारासंबंधी राखीव कक्षात गप्पा मारत बसल्या होत्या.

केस पेपर खिडकीवर गर्दी
केस पेपरसंबंधीच्या खिडकीवर प्रचंड गर्दी झाली होती. एक कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांना किंवा केस पेपर काढण्यासाठी उभ्या असलेल्या व्यक्तींना शांतता राखण्याचे आवाहन करीत होता. पण खिडकीसमोर लोटालोटी, रेटारेटी असा प्रकार सुरू होता. त्यात महिलांना अधिकचा त्रास होत असल्याचे दिसून आले.