शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मायग्रेनचा त्रास होतो?-तुमची लाइफस्टाईल हा तर प्रॉब्लम नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 17:19 IST

सरासरी 7 पैकी एका व्यक्तीस मायग्रेन होऊ शकतो, आणि त्याचा ट्रिगर आपल्या लाइफस्टाईलमध्येही असू शकतो.

ठळक मुद्देसतत स्ट्रेस, चिडचिड, अती डिहायड्रेशन यानंही मायग्रेशनचा त्रास होऊ शकतो.

-निशांत महाजन 

मायग्रेनचा त्रास अनेकजणांना असतो. असह्य होते डोकेदुखी. त्यावर उपचार केले जातात. काही दिवस बरे गेले की पुन्हा त्रास सुरु. काहीजणांना मायग्रेनचा त्रास विशिष्ट काळातच होतो. या डोकेदुखीवर उपचार आहेतच पण सरासरी 7 पैकी एका व्यक्तीस मायग्रेनचा त्रास होत असतो. आणि त्याचा ट्रिगर त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये असतो असा अभ्यास अलिकडेच प्रसिद्ध झाला आहे.डॉ. रिकाडरे डी कफ यांनी केलेल्या अभ्यासानुसार मायग्रेन होण्याची कारणं, मायग्रेन उसळण्याचे ट्रिगर बरेच आहेत. मात्र मायग्रेनचे मुख्य ट्रिगर्स हे मानसिक तणावाशी संबंधित आहेत, स्ट्रेसशी संबंधित आहेत असं दिसतं. त्यातही चिडचिड, अस्वस्थता, सततचे टेन्शन यानं मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो. याशिवाय खूप कॉफी पिणं, डिहायड्रेशन, जेवण टाळणं किंवा अवेळी जेवणं, खूप गोड किंवा अती जंक खाणं यानंही मायग्रेन उसळू शकतो.म्हणून लाइफस्टाईलशी संबंधित या गोष्टींकडे लक्ष द्या. मायग्रेन असेल तर नक्की द्या, नसेल तर होणार नाही म्हणून काळजी घ्या.1) आपली जीवनशैली सांभाळा. आहार-विहार-झोप यांच्या वेळा शिस्तीत सांभाळा.2) अती पेन किलर्स घेऊ नका.3) रोज वेळेवरच जेवा. सतत जेवण टाळणं, किवा भूक मारणं, अपरात्री जेवणं, खूप वेळ उपाशी राहणं असं करू नका.4) अती व्यसन करू नका.5) स्ट्रेस, टेन्शन, मानसिक अस्वास्थ्य असेल तर समुपदेशन घ्या.6) गरोदर महिलांना हा त्रास होऊ शकतो, त्याकाळी दुर्लक्ष करू नका.7) पाळीच्या दिवसांत किंवा हार्मोन्सचं असंतुलन असेल तरीही मायग्रेनचा त्रास संभवतो.