शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

25 मिनिटं ध्यान करा; डिमेन्शियाचा धोका टाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 13:20 IST

माईण्डफुलनेस मेडिटेशन केली तर डिमेन्शिया, अल्झायमर या आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.

ठळक मुद्देध्यान धारणा, श्वसनाचे प्रकार हे सारं मन शांत करण्यासाठी आवश्यक आहे, पण ते नियमित करायला हवं.

आपलं कम्प्युटर गरम होतं, हॅँग होतं तर ते आपण रिस्टार्ट करतो, त्यातल्या नको त्या फाईल्स उडवतो, स्पॅड डिलीट करतो पण आपल्या मेंदूचं काय? आपला मेंदू, मन सतत हजारो विचारांनी भरलेलं असतं. सगळा किचाट. त्यातून एक गोष्ट नीट होत नाही. अनेक गोष्टी आपण विसरतो, आणि काही तर मागेच पडतात. त्यातून अनेकांना नंतर डिमेन्शिया अर्थात विस्मरणाचा त्रास होऊ शकतो. पुढे अल्झायमर होण्याचीही शक्यता असते. त्यावर उपाय म्हणजे माइण्डफुलनेस मेडिटेशन.ध्यान धारणा केल्यानं मेंदूला विश्रांती आणि तजेला दोन्ही मिळू शकतो. त्यातून मेंदूची स्मरणशक्ती तर वाढतेच पण चित्त एकाग्र झाल्यानं काम पटापट आणि उत्तम होतात, त्याचा आनंद मिळतो असंही एक अभ्यास सांगतो.युनिव्हर्सटिी ऑफ वॉटरलू या विद्यापीठानं केलेल्या अभ्यासानुसार 25 मिनिटं माईण्डफुलनेस मेडिटेशन केल्यास आपल्या मेंदूचं विचारचक्र बदलतं. थिकिंग पॅटर्न बदलतात. इमोशलन रिस्पॉन्स आपण जे देतो ते बदलून योग्य रिस्पॉन्स देणं सुरु होतं. त्यातून डिमेन्शियासारखे आजारही टाळले जातात. मेंदूला कायम चित्त एकवटण्याची सवय लागते यासोबतच हठ योगचाही अभ्यास करण्याचा सल्ला हा अभ्यास देतो. त्यामुळे आपल्या मेंदूत साचलेला कचरा साफ करुन, मेंदूला तरतरी देणे, त्याची सजगता वाढवणे हे गरजेचे आहे.पाश्चिमात्य जगात सध्या या माइण्डफुलनेस मेडिटेशनची विशेष चर्चा आहे. सतत धावपळ, डोक्यात हजारो विचार, त्याचा ताण, शरीराच्या व्याधी, नातेसंबंध आणि यासह शेकडो गोष्टी एकाचवेळी करण्याची सवय यामुळे मेंदू शिणतो. आपण जी गोष्ट करतो त्या गोष्टीत आपलं लक्षच नसतं, आपलं चित्त भरकटलेलं असतं त्यातून जी कृती आपण करतो ती कशी केली याची संवेदनाही मेंदूर्पयत पोहचत नाही. त्यामुळे त्या कामात मेंदू नसतो, शिवाय त्याचा आनंदही मिळत नाही.हे सारं टाळायचं तर ध्यान करणं, ते शिकून घेणं, शांत बसणं, स्वतःवर लक्ष केंद्रित  करणं गरजेचं आहे.