शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हाऽऽ हाऽऽ.. अरे, हसा की.. जगण्याच्या आनंदासाठी तरी हसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 17:50 IST

हसणं तुमचंच नाही, तुमच्या संपर्कात आलेल्यांचंही आयुष्य बदलून टाकील

ठळक मुद्देताण कमी होईलब्लड प्रेशरचा त्रास कमी होईलहृदयविकाराची शक्यता दूर पळेलनिगेटिव्हिटी कमी होईलआव्हानं पेलण्यासाठी सज्ज व्हांल

- मयूर पठाडेकारणं अनेक आहेत, पण आपल्या आयुष्यातून हसणं खूपच कमी झालं आहे. सांगा, खळखळून, मनमोकळं हसणारी अशी किती माणसं आपल्याल आजकाल दिसतात. जवळपास नाहीच. आपल्या आयुष्यातलं हसणं कमी झालं आणि आपल्या आयुष्यातला आनंदही कमी झाला!...आपल्या आयुष्यातला हा आनंद आपल्याला परत मिळवयचा, तर हे खखळून हसणं पुन्हा आपल्या आयुष्यात यायला हवं.त्यासाठी अगदी प्रयत्नपूर्वक काही गोष्टी करायलाही हव्यात. ज्यामुळे हसता येईल, हसवेल अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला हव्यात. अगदी काहीच नाही, तर लाफ्टर क्लबही जॉइन करता येईल.हसण्यानं होणारे फायदे-

१- ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांचा त्रास हसण्यामुळे कमी होऊ शकतो. इतकंच काय, हार्ट अटॅकची शक्यताही कमी होऊ शकते.२- आपल्याला रोज कसले ना कसले ताण असतात. या ताणातच आपण जगत असतो. खळखळून हसण्यानं आपली स्ट्रेस हार्मोन लेव्हल कमी होते.३- हसण्यामुळे आपल्या हृदयाची क्षमताही वाढते आणि अर्थातच त्यामुळे हृदयाचे विकार आपल्यापासून लांब राहतात.४- आपल्या शरीरातील टी-सेल्स वाढण्यास मदत होते. टी-सेल्समुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे हेल्दी लाईफ जगण्यासाठी हसणं हा एक महत्त्वाचा उपाय होऊ शकतो.५- हसण्यामुळे आपल्या शरीरातील एन्डॉर्फिनचं प्रमाण वाढतं. एन्डॉर्फिन हे एक नॅचरल पेनकिलर आहे. आपली दुखणी स्वत:हून बरं करणारं शरीरातलंच हे एक रामबाण औषध आहे.६- तुम्ही बघा, जो जास्त हसतो, तो नेहमी प्रसन्न असतो आणि त्यामुळे त्याची स्मरणशक्तीही उत्तम असते.७- हसण्यामुळे आपल्यातली निगेटीव्हिटी कमी होते आणि कुठलीही आव्हानं पेलण्यासाठी आपण सज्ज राहतो. आपला मूड त्यामुळे आनंदी राहतो आणि जीवनाकडे बघण्याची दृष्टी सकारात्मक होते.८- हसणं आणि क्रिएटिव्हिटी यांचा अगदी जवळचा संबंध आहे. हसणारी लोकं तुलनेनं जास्त क्रिएटिव्ह असतात हे संशोधनातून सिद्धही झालं आहे.त्यामुळे हसा, हसत राहा, इतरांनाही हसवा आणि आपल्याप्रमाणेच आपल्या आजूबाजूचं वातावरणंही हसरं, प्रसन्न करा. ज्यातून सगळ्यांचंच आयुष्य आनंदी, समृद्ध होईल आणि प्रत्येकाला जगण्याचं बळ देताना आयुष्यात रंग भरील..