शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

संसर्गापासून बचावासाठी फळं आणि भाज्या धुण्याची योग्य पद्धत कोणती? WHO, CDC दिल्या 'या' गाईडलाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 20:14 IST

बाहेरून फळं किंवा भाज्या आणल्यानंतर स्वच्छ करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. 

कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लहानात लहान गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. सोशल डिस्टेंसिंग, सार्वजनिक स्थळी मास्कचा वापर करणं, वारंवार हात धुणे यांसारख्या उपायांनी कोरोना विषाणूंच्या संसर्गापासून लांब राहता येऊ शकतं. बाहेरून फळं किंवा भाज्या आणल्यानंतर स्वच्छ करताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. 

फळं आणि भाज्या धुण्यासाठी साबणाच्या पाण्याचा वापर करू नका. कारण त्यातील केमिकल्समुळे आरोग्याला धोका उद्भवू शकतो. शक्यतो कोमट पाण्याने भाज्या धुण्याचा प्रयत्न करा. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार पाण्यात थोडंस व्हिनेगर घाला. याचे मिश्रण तयार करून फळं आणि भाज्या साफ करा. जर तुम्हाला भाज्या धुण्यासाठी व्हिनेगर वापरायचं नसेल तर मीठाच्या वापरही करू शकता. भाज्या आणि फळं शक्यतो वाहत्या पाण्यात धुवा.

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार फळं आणि भाज्या योग्य तापमानात साठवून ठेवा.  अन्नात प्रामुख्याने ३ प्रकारचे माइक्रोऑर्गेनिजम्स असतात.ज्यात बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगसचा समावेश असतो. पहिल्या प्रकारातील मायक्रोऑर्गेनिजम्स आपल्या अन्नाला निरोगी आणि चविष्ट बनवतात, बॅक्टेरिया दूध आणि दही जमवत असलेल्या पदार्थात असतात. तर दुसऱ्या प्रकारचे बॅक्टेरिया अन्नाची चव खराब करतात. त्यामुळे जेवणााचा दुर्गध येतो. तर  तिसऱ्या प्रकारचे बॅक्टेरिया वासामुळे कळून येत नाहीत. 

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार या माइक्रोऑर्गेनिजमला  पैथोजेनिक माइक्रोऑर्गेनिजम असं म्हणतात. जर कोणत्याही व्यक्तीने अशा अन्नाचे सेवन केले तर पोटदुखी, अतिसार, अपचन, उलट्या, ताप यांसारख्या समस्या उद्भवतात. अनेकदा प्रदुषित अन्नाचे सेवन केल्यामुळे मृत्यूचाही सामना करावा लागतो.पॅथोजेनिक माइक्रोऑर्गेनिजम शरीरात वेगाने वाढून आपली संख्या वाढवतात. त्यामुळे आरोग्यांच्या समस्या जाणवतात. या स्थितीपासून बचाव करण्यासाठी काही गाईडलाईन्स फॉलो करणं गरजेचं आहे.

काही खाण्याआधी किंवा अन्नपदार्थांना स्पर्श करण्यासाठी हात स्वच्छ धुवा. फ्रिजमध्ये उरलेले अन्न ठेवताना कच्च आणि शिजलेले पदार्थ वेगवेगळे ठेवा. त्यामुळे किटाणू निर्माण होणार  नाहीत. जेवण बनवताना चांगले शिजवून मगच सेवन करा. अर्धवट शिजलेले अन्न शरीरासाठी घातक ठरू शकते. योग्य तापमानात अन्न साठवून ठेवा. खाद्यपदार्थ विकत घेताना पाकिटावर लिहिलेला मजकूर नीट वाचा.  चांगल्या दर्जाच्या मसाल्यांचा वापर करा. 

व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण

भय इथले संपत नाही! देशात कोरोनापेक्षाही घातक आजाराचा शिरकाव; 'या' शहरात आढळला रुग्ण

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या