शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन पार्क परिसरात दत्तक झाड योजनेचा प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 13:46 IST

कोल्हापूर, दि.२९ : दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठया प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठया प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन उद्योजक संग्राम पाटील यांनी केली.

ठळक मुद्देरहिवाशांचा सहभाग

कोल्हापूर, दि.२९ : दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठया प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठया प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन उद्योजक संग्राम पाटील यांनी केली.‘ग्रीन पार्क’ परिसरातील रहिवाशांनी आपल्या परिसरात वृक्षारोपणासाठी कंबर कसली आहे. वृक्षलागवडीसह संगोपणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेऊन परिसरात ‘दत्तक झाड योजना’ राबविली जात आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगरसवेक लाला भोसले होते. बी.डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.नगससेवक भोसले म्हणाले, वृक्षारोपण ही गरज व त्याचे महत्व जवळपास प्रत्येकाला समजून चुकले आहे. भरपूर वृक्ष लावलेल्या बागेत नियमित फिरल्याने,व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. तणावामुळे शरीरावर होणाºया नकारात्मक परिणामांचा प्रभावही कमी होतो. झाडे जितकी जास्त असतील तितक्या प्रमाणात श्वसनाशी संबंधित रुग्णांची संख्या घटेल, असे संशोधनकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे फक्त वृक्षारोपण न करता त्यांचे संगोपण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.पुरात्वत विभागाचे माजी संचालक अर्जुन देसाई म्हणाले, दत्तक झाड योजने अंतर्गत प्रत्येकाने झाडांना आपल्या नातेवाईकांचे नाव दिल्याने त्या झाडाबद्दल प्रत्येकाच्या मनात एक आपुलकी निर्माण होईल. पर्यावरण संवर्धनाची फक्त एकट्याचे काम नसून त्यासाठी सर्वांनीच हातभार लावल्यास नक्कीच ‘ग्रीन पार्क’ हे नाव सार्थकी ठरेल.यावेळी श्रीकांत भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर एस. एस. मुल्ला यांनी आभार मानले. याप्रसंगी मुरलीधर आळतेकर, चव्हाण, चंद्रकांत पाटील, डॉ. रणजीत नरके, पी.एल.मुंडे, डॉ. उदयसिंग देसाई, युवराज भोसले, गंधार लोंढे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.प्रत्येक झाडाला नाव....ग्रीन पार्क परिसरात नागरिकांच्या माध्यमातून हा प्रकल्प या परिसरात राबविला जाणार आहे. केवळ झाडे लावून काम संपणार नाही तर ते झाड येथील रहिवाशी दत्तक देऊन त्याच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी घेणार आहेत. तसेच त्यांच्या इच्छेनुसार दत्तक झाडाला स्वत:चे किंवा परिवारातील कोणाचेही नाव दिले जाणार आहे.