शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात राजकीय घडामोडींना ‘फुल्ल स्पीड’

By admin | Updated: September 13, 2014 00:10 IST

आज गडकरी सांगलीत : अजितराव घोरपडे, डोंगरेंचा भाजप प्रवेश,

आज गडकरी सांगलीत : अजितराव घोरपडे, डोंगरेंचा भाजप प्रवेश, पृथ्वीराज देशमुख भिलवडीत गडकरींना भेटणारसांगली : आचारसंहिता जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीला अवघा महिना राहिल्याने वातावरण गरम होऊ लागले आहे. त्यातच केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी उद्या, शनिवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी (पप्पू) डोंगरे यांचा भाजपप्रवेश होणार आहे. दरम्यान, सायंकाळी आचारसंहिता लागू होताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडील वाहने प्रशासनाने जमा करण्यास सुरुवात केली, शिवाय प्रचार होणारे फलक उतरवण्यास गती आली.यंदा विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा कालावधी कमी करण्यात आला आहे. आज सायंकाळी आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडील वाहने प्रशासनाने जमा करण्यास सुरुवात केली. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाल २१ सप्टेंबरला संपणार होता. परंतु, त्यापूर्वीच नऊ दिवस आधी आचारसंहिता लागल्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना गाड्या जमा करून कामकाज थांबवावे लागले. महापालिकेच्या सुमारे ४५ कोटींच्या कामांना ‘ब्रेक’ लागल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी वाहने व मोबाईल सीमकार्ड प्रशासनाकडे जमा केली. सायंकाळनंतर महापालिका प्रशासनाच्यावतीने डिजिटल हटाव मोहीम हाती घेण्यात आली असून, पन्नासहून अधिक फलक काढण्यात आले. मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी उभारण्यात आलेल्या स्वागतकमानी उतरवण्यास सुरुवात झाली. जिल्हाभरात सर्वत्र आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार केंद्रीय रस्ते व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडेही येणार असून, कवठेमहांकाळ येथे राष्ट्रवादीचे नेते अजितराव घोरपडे आणि काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी (पप्पू) डोंगरे यांचा भाजपप्रवेश त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातूनच भाजपच्या प्रचारतोफांना बत्ती दिली जाणार आहे. सकाळी गडकरी कोल्हापूरहून आष्ट्यामार्गे येताना भिलवडीमध्ये राष्ट्रवादीचे नेते पृथ्वीराज देशमुख यांची भेट घेणार आहेत. देशमुख पलूस-कडेगाव मतदारसंघातून इच्छुक असून, या भेटीत महायुतीतील त्यांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत. कवठेमहांकाळच्या कार्यक्रमानंतर गडकरी मिरजेतील कुपवाड रस्त्यावरील फार्महाऊसवर कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.