शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

विनापरवाना सॉस तयार करणार्‍या कंपनीवर एफडीएचा छापा ७११२ किलोचे सॉस केले जप्त

By admin | Updated: February 17, 2016 00:24 IST

मुंबई: घाटकोपर येथे विना परवाना सॉस तयार करणार्‍या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धाड टाकली. येथे अस्वच्छ जागेत आणि फळे, भाज्या व्यतिरिक्त अन्य पदार्थ वापरुन सॉस तयार केले जात होते. या कारखान्यातून ७ हजार ११२ किलोच्या सॉससह १ लाख ८८ हजार ९१६ रुपये किंमतीचा अन्य अन्न पदार्थांचा साठा जप्त ...


मुंबई: घाटकोपर येथे विना परवाना सॉस तयार करणार्‍या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धाड टाकली. येथे अस्वच्छ जागेत आणि फळे, भाज्या व्यतिरिक्त अन्य पदार्थ वापरुन सॉस तयार केले जात होते. या कारखान्यातून ७ हजार ११२ किलोच्या सॉससह १ लाख ८८ हजार ९१६ रुपये किंमतीचा अन्य अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
विक्रीसाठी कोणताही अन्नपदार्थ तयार करताना एफडीएचा परवाना असणे आवश्यक आहे. मात्र, घाटकोपर, असल्फा येथील आझाद मार्केटमध्ये मे. कुमार फूड प्रॉडक्टसचा कारखान्यात विनापरवाना सॉस तयार केले जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. या माहिती आधारे एफडीएच्या दक्षता विभागाने १२ फेब्रुवारी रोजी या कारखान्यावर धाड टाकली. यावेळी कारखान्यात व्हेजिटेबल सॉस, सोयाबीन सॉस, टोमॅटो सॉस इत्यादींची निर्मिती केली जात होती. अस्वच्छ जागेतही सॉस तयार करत होते, अशी माहिती एफडीएचे सह आयुक्त दक्षता हरीश बैजल यांनी दिली.
नियमानुसार, सॉस बनविताना आवश्यक असणार्‍या फळे, भाज्या अथवा व्हेजिटेबल पल्पचाच फक्त वापर केला पाहिजे. या कारखान्यात सॉस बनवताना राईस आटा, चिली पावडर आणि कृत्रिम रंगाचा वापर केला जात होता. तर, टोमॅटो सॉस बनवण्यासाठी गाजर आणि बीटचा वापर केला जात होता. या प्रकरणात व्हेजिटेबल सॉस, सोयाबीन सॉस, टोमॅटो सॉस आणि अन्य घटक अन्नपदार्थांबरोबर ९ अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे बैजल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)