शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या फाईलवर स्वाक्षरी करणारी एक कर्मचारी...

By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST

कोट्यवधींच्या फाईलवर स्वाक्षरी करणारी एक कर्मचारी...

कोट्यवधींच्या फाईलवर स्वाक्षरी करणारी एक कर्मचारी...
- किसनाबाईने वाहिले अंगणवाडीसाठी जीवन
(फोटो आहे)

नागपूर : सरपंच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी पदे भूषविलेली, एकेकाळी लाल दिव्यातून फिरणारी व विकासांच्या कोट्यवधींच्या फाईलवर स्वाक्षरी करणारी एक महिला आजही चंद्रमोळीच्या मोडकळीस आलेल्या घरात राहते. अंगणवाडी सेविका म्हणून तुटपुंज्या वेतनात आपले घर चालविते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटाव्यात एवढीच तिची मागणी आहे.
किसनाबाई भानारकर त्या महिलेचे नाव. भंडारा जिल्ह्यातील, पवनी तहसीलमधील कन्हाळा येथे राहणाऱ्या किसनाबाई शुक्रवारी अंगणवाडीच्या निघालेल्या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
बालकांच्या मानिसक विकासाचा व वाढीचा पाया भक्कम करणे, शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करणे, बालकांमधले मृत्यू, आजार, कुपोषण कमी करणे आणि यामुळे होणारी शैक्षणिक गळती थांबवणे. आई आणि कुटुंबाचे बालसंगोपनाचे कौशल्य वाढवणे ही उद्दिष्ट ठरवून किसनाबाई काम करीत आहे. त्यांना बोलते केले असता त्या म्हणाला, अंगणवाडी म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण. याच आधारावर मला लोकांनी १९९५ मध्ये कन्हाळा गावाचे सरपंच केले. १९९७ मध्ये समाजकल्याण सभापती झाले आणि १९९८ मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले. यादरम्यान अनेक विकास कामांच्या कोट्यावधींच्या फाईलवर स्वाक्षरी केल्या. लाल दिव्याच्या गाडीतून चंद्रमोळीच्या झोपडीत शिरताना कधीही लाज वाटली नाही. त्यावेळीही चटणी भाकर खात होती आजही खाते. नशिबाने जेवढं भरभरून दिले तेवढंच हिसकावूनही घेतल. १९८६ मध्ये पती गेले. २०१०मध्ये दोन्ही मुले पुरात वाहून गेली. आज मी एकटी असलीतरी अंगणवाडीतील असंख्य मुले माझ्यासोबत आहे. आता तेच माझे कुटुंब आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी मी स्वत: अनुभवत आहे. त्या म्हणाल्या, कुपोषण हटवणे ही सोपी गोष्ट नाही. ही लढाई समाजाने अंगणवाडीवर सोपवून समस्या सुटणार नाही. अंगणवाडी केवळ यासाठी मदत करते. अंगणवाडी सेवांमध्येही अनेक अडचणी असल्याने शासनाने त्या सोडवाव्यात एवढीच मागणी आहे.