शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रवासाला जायचं का? पॅकिंग करण्याआधी या टिप्स वाचाच. प्रवासात मनस्ताप अजिबात होणार नाही!

By admin | Updated: June 22, 2017 16:40 IST

उत्तम पॅकिंग हा प्रवासाचा बेसिक मंत्र आहे. पण या पॅकिंगसाठी काय करावं हे जितकं महत्वाचं असतं तितकंच महत्वाचं असतं ते काय करु नये हे लक्षात ठेवून पॅकिंग करणं.

- अमृता कदमसुट्टीवर जाताना उत्तम पॅकिंग करणं ही खरंतर एक कलाच आहे. त्यातही विमानानं प्रवास करायचा असेल तर सामानाचं हेच पॅकिंग खूपच विचारपूर्वक आणि तोलून मापून करावं लागतं. उत्तम पॅकिंग हा प्रवासाचा बेसिक मंत्र आहे. पण या पॅकिंगसाठी काय करावं हे जितकं महत्वाचं असतं तितकंच महत्वाचं असतं ते काय करु नये हे लक्षात ठेवून पॅकिंग करणं. जर पॅकिंग नीट झालं नाही तर प्रवासभर किरकोळ गोष्टींसाठी धावपळ करावी लागते नाहीतर मग गैरसोय सहन करावी लागते. म्हणूनच पॅकिंगमध्ये सरसकटपणे केलेल्या चुका समजून घेऊन त्या टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात. पॅकिंग करताना काय काळजी घ्याल?

 

 तुमच्या सामानाची वजन मर्यादा अर्थातच लगेज लिमिट माहित करून घेणं

याबाबतीत जितक्या विमान कंपन्या तितके नियम अशी परिस्थिती आहे. उदाहरणार्थ परदेशातल्या काही विमान कंपनीच्या तिकीटावर तुम्ही एकच खासगी वस्तू घेऊन जाऊ शकता. मोठी केबिन बॅग (20 किलो वजनापर्यंत) आणि तपासणी केलेली सुटकेस अशा दोन्हींसाठी तुम्हाला जादा किंमत मोजावी लागते. तर काही कंपन्या मात्र वजनाऐवजी बॅगेच्या आकारावर बंधनं घालतात. तुमची सामानाची बॅग ही 56 बाय 45 बाय 25 सेमी पेक्षा जास्त आकाराची नसावी असा काही कंपन्यांचा नियम आहे. त्यामुळे या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी तुम्हालाच थोडंफार संशोधन करावं लागेल. तुमच्या तिकिटावर लिहिलेल्या बॅगेज अलाऊन्ससंदर्भातल्या सूचनांकडे बारकाईनं लक्ष द्या. थोडं हुशारीनं सामान पॅक केलंत तर कधीकधी तुम्हाला चेक्ड लगेजची गरजही भासत नाही. त्यामुळे अतिरिक्त बॅगेज फी तर वाचतेच शिवाय त्या वापरायलाही सुटसुटीत होतात.फार पुढचा प्लॅन करु न ठेवणंप्रवासात काही गोष्टींची खरंच गरज आहे का, याचा विचार करून सामान खरेदी करून ठेवा. पर्यटनाच्या ठिकाणी तुम्ही नेमकं काय करणार आहात ते ठरवून त्यावेळी नेमकं तिथलं हवामान कसं असतं हेही जाणून घ्या. कारण हवामानानं दगा दिला तर पॅक केलेलं सामान तुम्हाला केवळ हमालासारखं वागवावं लागेल. म्हणजे अमेरिकेत फ्लोरिडासारख्या शहरांना भेट देऊन ओरलँडोच्या उत्तमोतम मॉलची सफर करणं हेच तुम्हाला हवं असेल तर मुळात आधी जाताना कमी सामान पॅक करून न्या. नवीन खरेदी केलेले कपडेच फिरताना वापरा. म्हणजे येताना सामान घेऊन यायला थोडी जागाही राहाते.चप्पल-बूट पॅकिंगपॅकिंगमधल्या चुकांमधली हमखास होणारी चूक म्हणजे बूट आणि चपलांचं पॅकिंग. आणि हो इथे आपण केवळ हाय हिल्स किंवा ग्लॅडिएटर सँडल्सबद्दलच बोलतोय असं नाही. कधीकधी हायकिंग बूटही मोठी जागा व्यापतात आणि विनाकारण बॅगेचं वजनही वाढतं. त्यामुळे कितीही मोठा प्लॅन असला तरी दोन जोड्यांशिवाय अधिक बूट-चप्पल सामानात भरु नका. प्रवास सुखकर करायचा असेल तर हा नियम लक्षात ठेवायलाच हवा. शिवाय या बूट चपलांनाही केवळ पादत्राणं म्हणून बघू नका तर पॅकिंग अ‍ॅक्सेसरीज म्हणून त्यात सॉक्सच्या काही जोड्या, आवरणासाठी प्लॅस्टिक बॅग्ज अशा गोष्टीही टाकून ठेवा. शिवाय हा तुमच्या सामानातला सर्वात वजनदार घटक असल्यानं तो नेहमी तळातच असेल, जेणेकरु न वजनाचं संतुलन होईल याची काळजी घ्या.

 

सामानाची बेशिस्त बांधाबांध टाळाप्रवासाला जातानं त्या ठिकाणाच्या हवामानाची माहिती घेणं, किंवा नेमकं काय पॅक करायला हवं याइतकंच महत्वाचं आहे तुमची बॅग संपूर्ण प्रवासात शिस्तबद्ध ठेवणंपॅकिंग क्यूब्ज हे तुमच्या यादीत सर्वात वरच्या क्रमाकांवर असायला हवेत. कारण वेगवेगळ्या वस्तू बॅगमधून अलगद शोधून काढण्यासाठी ते तुमच्या कामी येतात. शिवाय काही पारदर्शक पॅकिंग क्यूबचा फायदा हा होतो की सुरक्षा तपासणीवेळी तुम्हाला तुमची सगळी सौंदर्य प्रसाधनं टेबलावर पसरावी लागत नाहीत. तेव्हा प्रवासाला जाताना तुमची बॅगही अशी निवडा जिला काही मल्टीपरपज कंपार्टमेंट असतील. किंवा तुम्ही पॅकिंग क्यूब्ज आॅनलाइन खरेदीही करु शकता. या बेसिक गोष्टी जरी लक्षात ठेवल्यात, तरी तुमचे प्रवासातले निम्म्याहून अधिक श्रम नक्कीच वाचतील.