राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे मेडिकल करू नका! (बातमी जोड)
By admin | Updated: July 26, 2015 23:38 IST
-कॅन्सरच्या मृत्यूची संख्या वाढली सहा टक्क्याने
राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे मेडिकल करू नका! (बातमी जोड)
-कॅन्सरच्या मृत्यूची संख्या वाढली सहा टक्क्याने खा. दर्डा म्हणाले, कॅन्सरला खूप जवळून पाहिले आहे. कर्करोगाच्या वेदना काय असतात, त्या अनुभवल्या आहेत. यावर सर्वांनी मिळून काम करायला हवे. कारण याची आकडेवारी फार भयावह आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल आणि कॅन्सर रिसर्च इन्स्टट्यिूटच्या आकडेवारीनुसार २०१२ व २०१४ मध्ये कॅन्सरमुळे मरणाऱ्यांची संख्या सहा टक्क्याने वाढली आहे. २०१४ मध्ये ४ लाख ९१ हजार ५९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच रोज साधारण १३०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू कॅन्सरमुळे होत आहे. २०१५ मध्ये साडेनऊ ते दहा लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे, जगातील ३० टक्के कॅन्सरचे रुग्ण एकट्या भारतात आहेत. यातही ३० टक्के रुग्ण हे डोके व मानेच्या कॅन्सरचेे आहे तर ३० टक्के रुग्ण हे तोंडाच्या कॅन्सरचे आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे बदलती जीवनशैली तसेच व्यसनांमुळे युवा वर्गात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. -शिक्षणात जीवघेण्या रोगांची माहिती द्यावीखा. दर्डा म्हणाले, देशात मधुमेह, हृदयविकार आणि कॅन्सर हे जीवघेणे आजार वाढत आहे. या आजाराच्या माहितीचा अंतर्भाव शिक्षणात केला तर त्यांच्यात जागृती होऊन व्यसनांचे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांच्या लक्षात येतील. ते व्यसनांपासून दूर राहतील व आजाराला प्रतिबंध बसेल.देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे ३०० आरोग्य केंद्र आहेत. परंतु यातील ४० टक्के केंद्रामध्ये सोयी उपलब्ध नाहीत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ६०० अद्ययावत केंद्रांची गरज असून राष्ट्रस्तरावर कॅन्सरबाबत जागरुकता निर्माण करायला हवी, असेही ते म्हणाले. या हॉस्पिटलसाठी आवश्यक बाबी पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन पालकमंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिले. संचालन किशोर गलांडे यांनी केले तर आभार अशोक क्रिपलानी यांनी केले. कार्यक्रमाला आँकोलॉजी ॲण्ड रिसर्चचे संचालक डॉ. पूरविश पारेख, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे, प्रसिद्ध ईएनटी सर्जन डॉ. मदन कापरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अजय काटे, डॉ. संगीता उगेमुगे, मनपा हनुमाननगर झोनच्या सभापती सारिका नांदुरकर, डॉ. बी. के. शर्मा व इतर मान्यवर उपस्थित होते.