विनामेकअप दिसा सुंदर
By admin | Updated: September 2, 2014 19:35 IST
विना मेकअप दिसा सुंदर
विनामेकअप दिसा सुंदर
विना मेकअप दिसा सुंदरनेहमी सुंदर दिसावे अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. त्यासाठी तर्हेतर्हेचे उपायही केले जातात. सुंदर दिसण्यासाठी त्या मेकअपचाही आधार घेत असतात; पण मेकअपने मिळालेले सौंदर्य काही काळापुरतेच असते, त्याशिवाय मेकअपने त्वचेचे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे मेकअप न करता सुंदर दिसायचे असेल, तर तुमच्या रूटीनमध्ये पुढील काही सवयींचा समावेश नक्की करा. त्यामुळे चेहर्यावर निखार तर येईलच, त्याशिवाय त्वचेचे आरोग्यही टिकून राहील. सकाळी आणि रात्री चेहरा स्वच्छ करामेकअपशिवाय सुंदर दिसण्याची तुमची इच्छा असेल, तर दररोज सकाळी आणि रात्री चेहरा स्वच्छ करणे गरजेचे आहे. ही गोष्ट तुम्हाला खूपच साधी सोप्पी वाटत असेल; पण अनेक अशा तरुणी आहेत, ज्या दररोज सकाळी उठल्यावर त्यांचा चेहरा स्वच्छ करत नाहीत. ही त्वचेसाठी घातक सवय आहे. दररोज सकाळी आणि रात्री चेहरा स्वच्छ केला, तर चेहर्यावरच्या पिंपल्सची समस्या खूप कमी होईल. पोषक भोजन घ्यात्वचेच्या सौंदर्यासाठी पोषक आणि सकस आहार गरजेचा आहे. सकस आहारामुळे आतून त्वचा सुंदर होते. जेवणात ताजी फळे, हिरव्या भाज्यांचा वापर जास्त करावा. त्यामुळे त्वचेचा तजेला टिकून राहील. त्याउलट जास्त तेलकट खाद्यपदार्थ, तिखट आणि मसालेदार खाण्याने पिंपल्स आणि तेलकट त्वचेची समस्या वाढते. त्यामुळे जमेल तसा दररोज पौष्टिक आहार घ्यायला हवा. योग्य फेशियल मॉईश्चरायझरचा वापरचेहरा स्वच्छ केल्यानंतर फेशिअल मॉईश्चरायझरचा वापर करणे गरजेचे असते. त्यामुळे चेहरा तजेलदार राहतो. बाजारात असे अनेक मॉईश्चरायझर मिळतात, ज्यामुळे तुमची त्वचा तेलकट आणि शायनी बनते. त्यामुळे चांगल्या आणि त्वचेसाठी योग्य अशा फेशिअल मॉईश्चरायझरचा वापर करावा. त्याशिवाय तुमचा मॉईश्चरायझर एसपीएफ-३० असावा, त्यामुळे तुमच्या चेहर्याचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण होईल.