शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

दुर्बिणीद्वारे पित्ताशयाच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे तीन वर्षीय चिमुकलीला मिळाले जीवदान उल्हास पाटील रुग्णालयात शस्त्रक्रिया : शिशु शल्यचिकित्सकांसह टिमचे यश

By admin | Updated: March 13, 2016 00:05 IST

जळगाव- पित्ताशयातील इन्फेक्शनमुळे त्रस्त झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यामुळे तिला जीवदान मिळाले आहे. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात शिशु शल्यचिकित्सकांसह टिमच्या प्रयत्नांंना यश आले आहे.

जळगाव- पित्ताशयातील इन्फेक्शनमुळे त्रस्त झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीवर दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यामुळे तिला जीवदान मिळाले आहे. डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात ही दुर्मिळ शस्त्रक्रिया करण्यात शिशु शल्यचिकित्सकांसह टिमच्या प्रयत्नांंना यश आले आहे.
जळगाव येथील रहिवासी असलेल्या प्रवीण सहस्त्रबुद्धे यांच्या तीनवर्षीये मुलीला गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. सुरुवातीला तिच्यावर तात्पुरते उपचार करण्यात आले. मात्र पोटाचे दुखणे अधिकच अस‘ झाल्याने या चिमुकलीला डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी तिची सिटीस्कॅन तपासणी करण्यात आली. या तपासणीत पित्ताशयामध्ये इन्फेक्शन झाल्याचे निदान झाले. तसेच पित्ताशय १२ सेंमी अंश गाठीच्या रुपात बदलले होते. एकॅल्क्युलम कोलेसिस्टायटीस असे या आजाराचे नाव असून हा आजार ५० वर्षे वयावरील व्यक्तींना याचा संभव असतो. पण अवघ्या तीन वर्षीय मुलीला हा आजार होणे हे अत्यंत दुर्मिळ आहे. कारण यापित्ताशयात गाठी झाल्याने ते शरीरात पसरण्याची शक्यता अधिक असते. रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. अशा परिस्थिीत रुग्णावर शस्त्रक्रिया करणे एकमेव पर्याय असतो. त्यामुळे शिशु शल्यचिकित्सक तथा दुर्बिण शस्त्रक्रिया विशेषज्ञ डॉ.मिलिंद जोशी यांनी या चिमुकलीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ५ मिमि व ३ मिमि इतक्या छोट्या छिद्रांमधून तिचे पित्ताशय काढण्यात शिशु शल्यचिकित्सक दुर्बिण शस्त्रक्रिया विशेषज्ञ डॉ.मिलिंद जोशी यांना यश आले. या शस्त्रक्रियेसाठी भुलतज्ज्ञ डॉ.बी.के.गहलोत, डॉ.महेंद्र मल्थ, पंकज चौधरी,डॉ.ऋतुराज काकड, डॉ.देवेंद्र चौधरी, डॉ.सागर व्यास यांचे सहकार्य मिळाले. या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टिममुळे तीन वर्षीय चिमुकलीला नवे जीवनदानच मिळाले. तिला विश्रांती साठी लहान बालकांच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले असून प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत आहे. सिस्टर ॲन्जेला, डॉ.ऋतुजा पाटील, डॉ.चांदनी मिश्रा हे तिची देखभाल करीत आहे.