शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बचतीसाठी जि.प.चा पुढाकार

By admin | Updated: June 1, 2016 02:15 IST

‘पाणी जीवनाला फुलविणारे आहे, त्याला विनाशापासून वाचवा’ असा संदेश जिल्हा परिषद देत आहे.

अध्यक्षांचा सहभाग : कर्मचारी करणार जलबचतीचा संकल्पगोंदिया : ‘पाणी जीवनाला फुलविणारे आहे, त्याला विनाशापासून वाचवा’ असा संदेश जिल्हा परिषद देत आहे. यंदा जि.प.च्या इमारतीवर पडणारे पाणी जमिनीत मुरविण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला असून जि.प.च्या मागील भागात असलेल्या खड्ड्यात ते पाणी मुरविले जाणार आहे. लोकमतच्या जलमित्र अभियानाने प्रेरित होऊन हा संकल्प केला आहे.पाण्याची बचत करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे पाणी अडवा पाणी जिरवा तसेच अनेक उपक्रम राबविण्यात येतात, परंतु पावसाळ्यात जिल्हा परिषदेच्या छतावर पडणारे पाणी वाहून जाते. परंतू आता असे होणार नाही. छतावर पडणारे पाणी पाईपव्दारे खाली आणण्यात येईल. जि.प. इमातीच्या मागे एक मोठा खड्डा आधीच तयार केला आहे. परंतु त्या खड्ड्यात कचरा व माती असल्याने त्याला खोल करून पाणी जमिनीत मुरविण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. मंगळवारी (दि.३१) स्वत: जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, जि.प.सदस्य रमेश अंबुले, ठाणा येथील जि.प. सदस्य शोभीलाल कटरे, सामान्य प्रशासन विभागाने उपमुख्य कार्यपालन अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी छताची पाहणी केली. पाण्याची बचत करण्यासाठी पावसाचे छतावर पडणारे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी (रेन वॉटर हार्वेस्टींग) तयारी सुरू केली आहे. जि.प.च्या इमारतीचे छत ८ ते १० हजार स्केअर फूटामध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी बचत होईल.अखेर नळाला बसविल्या तोट्याजिल्हा परिषदेच्या इमारतीत अनेक ठिकाणी नळ आहेत. या ठिकाणी कर्मचारी अधिकारी यांच्या बरोबर कामासाठी जि.प. मध्ये येणारे लोकही लघुशंकेकरीता किंवा शौचालयात जातात. परंतू नळाच्या तोट्या अनेक दिवसांपासून तुटल्या असताना त्याच्या दुरूस्तीकडे कोणाचे लक्ष नव्हते. त्यामुळे पाणी वाया जात होते. पाणी रोखण्यासाठी प्रत्येक नळाला तोट्या बसविण्यात आल्या आहेत.