शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार

By admin | Updated: June 19, 2016 01:31 IST

अनेक वर्षे मुंबईसारख्या महानगरात काम केल्यानंतर राज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख, ...

सीईओ पुलकुंडवार : वर्षभरात जिल्हा हागणदारीमुक्त करणारमनोज ताजने गोंदियाअनेक वर्षे मुंबईसारख्या महानगरात काम केल्यानंतर राज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख, अर्थात मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून काही दिवसांपूर्वीच रूजू झालेले डॉ.सी.एल. पुलकुंडवार यांनी अवघ्या काही दिवसातच आपल्या कामाची छाप पाडली आहे. थेट आयएएस असलेल्या अभिषेक कृष्णा यांच्यानंतर मधल्या काळातील सीईओंकडून अपेक्षित कामकाज झाले नसले तरी डॉ.पुलकुंडवार यांनी जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची मुलाखत घेऊन त्यांच्या कामकाजाची दिशा जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून पहिल्यांदाच सूत्रे हाती घेतल्यानंतर समोर कोणती आव्हाने आहेत, यावर ते म्हणाले, मुळात या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न कमी आहे. मानव विकास निर्देशांकही कमी आहे. त्यामुळे थोडी नैसर्गिक आपदा आली की लोक घाबरतात. कारण लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. वास्तविक हा जिल्हा पाणी आणि नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत संपन्न आहे. तरीही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दुबार पीक घेण्याचे प्रमाण फारच कमी आहे. शेतकऱ्यांना दुबारच नाही तर तिबार पीक घेण्यासाठीही संधी आहे. त्यासाठी त्यांना सिंचनाची पुरेशी व्यवस्था करून देऊन त्यांचा आर्थिक स्तर वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांनी केवळ धानपिकावर अवलंबून न राहता पाण्याचा योग्य वापर करून नगदी पिके घेतली पाहीजे. याशिवाय शेतीपुरक व्यवसायाकडेही वळले पाहीजे. शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहे, असे डॉ.पुलकुंडवार म्हणाले.जुन्या तलावांना पुनरूज्जिवित करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने ४१७ कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी ४४ पूर्णही झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळेल. जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांसह अनेक अधिकाऱ्यांना शिस्त नाही. नागपूरवरून अप-डाऊन करणाऱ्या ‘विदर्भवीरां’ना कसे वठणीवर आणणार यावर सांगताना ते म्हणाले, ही बाब माझ्याही निदर्शनास आली आहे. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरी पुन्हा सुरू करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला सूचना केल्या आहेत. तोपर्यंत मी अनेक ठिकाणी सरप्राईज व्हिजीट सुरू केल्या आहेत. अचानक कोणत्या विभागात किंवा जिल्ह्यातील एखाद्या कार्यालयात भेट दिल्यानंतर तेथील हजेरी रजिस्टर तपासून गैरहजर असणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देणे सुरू केले आहे.जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना, वाहनचालकांना ड्रेस कोड असताना कोणीही त्याचा वापर करीत नाही याकडे लक्ष वेधले असता त्यांनी याबाबतची नोटीस लगेच काढली जाईल, असे सांगून सर्व कर्मचारी, अधिकारी शिस्तीत वागतील असा विश्वास व्यक्त केला.शिक्षण विभागातील गोंधळाची स्थिती गेल्या काही महिन्यात सावरायला लागली असून लवकरच बिंदूनामावली निश्चित होईल. त्यानंतर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसह इतर सर्व विषय मार्गी लागतील, असे डॉ.पुलकुंडवार यांनी सांगितले. मात्र कर्मचारी-अधिकाऱ्यांनी कुठेही काम करण्याची तयारी ठेवावी. तशी मानसिकता सर्वांना तयार केली पाहीजे, असे आवाहन त्यांनी केले.