शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणा केल्याच्या संशयावरून जबर मारहाण

By admin | Updated: July 9, 2016 02:01 IST

जादुटोणा केल्याच्या संशयावरुन एका संतप्त जमावाने दोघांच्या घरात शिरून जबर मारहाण करण्यात आले.

एकोडी : जादुटोणा केल्याच्या संशयावरुन एका संतप्त जमावाने दोघांच्या घरात शिरून जबर मारहाण करण्यात आले. ही घटना गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एकोडी येथे १ जुलैच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लोकांमध्ये आजच्या वैज्ञानिक काळातही किती मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे, याची प्रचिती येते.एकोडी येथील रहिवासी मुरलीधर गोमा सांगोडे (५९) आणि चुन्नीलाल शिवलाल बिसेन (६०) या दोघांनी ‘माझ्या बायकोला भूत भरविले’ असे म्हणत आरोपी ४० ते ५० लोकांच्या जमावासह मुरलीधर सांगोळेच्या यांच्या घराकडे गेले. घराचे दार आतून बंद होते. त्यामुळे जमावापैकी श्रीराम बन्सीलाल खजरिया, अंगलाल बन्सीलाल खमरीया, सुनिता श्रीराम खजरिया, सीमा अंबालाल खजरिया व अशोक उके सर्व रा. एकोडी यांनी दाराला लात मारून उघडले. यानंतर घरात शिरुन कपडे फाटतेपर्यंत मुरलीदासला मारहाण करण्यात आली. जातीवाचक शिवीगाळ देवून तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून तुझ्याच चौकात फेकून देवू, अशी जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. आई-बहिण व नाना प्रकारची शिवीगाळ करण्यात आली.त्यावेळी सांगोळे यांच्या नातीनने माझ्या आजोबाला का मारता, असे विचारले असता तिला अशोक उके याने धक्का मारत खाली पाडले. एकाएकी झालेला हल्ला पाहून मोठ्याने आरडाओरड सुरू झाली. त्यामुळे शेजारी लोकांनी धाव घेतली. त्यामुळे मारहाण करणारे व सोबत असलेला ४०-५० लोकांचा जमाव निघून गेला. यानंतर या जमावाने आपला मोर्चा चुन्नीलाल शिवलाल बिसेन यांच्या घराकडे वळला. त्यात चुन्नीलाल बिसेन यांना जातीवाचक शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी सदर आरोपींनी दिली. या प्रकरणाची तक्रार मुरलीधर गोमा सांगोळे यांनी त्याच रात्री १० वाजताच्या सुमारास गंगाझरी पोलीस ठाण्यात केली. मात्र पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा (कलम ५०४, ५०६) नोंद केला. तर चुन्नीलाल बिसेन यांनी २ जुलै रोजी या प्रकरणाची तक्रार दाखल केली. यामुळे मुरलीधर सांगोळे व चुन्नीलाल बिसेन यांनी ज्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली त्यांच्याकडून जिवाला धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. (वार्ताहर)