शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अर्थशतकी तान्हा पोळ्याला जि.प. देणार पाठबळ

By admin | Updated: September 14, 2015 01:36 IST

येथे रविवारी साजरा झालेला ५६ वा तान्हा पोळा तिरोडा तालुक्यासाठीच नाही तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरला.

कटरे यांची ग्वाही : ५८० बाल नंदीधारक बालकांचा सहभागवडेगाव : येथे रविवारी साजरा झालेला ५६ वा तान्हा पोळा तिरोडा तालुक्यासाठीच नाही तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरला. या ‘अर्धशकती’ परंपरा लाभलेल्या तान्हा पोळ्याला जिवंत ठेवण्यासाठी आपण जि.प.स्तरावर नक्कीच सर्व प्रकारचे पाठबळ मिळवून देऊ, अशी ग्वाही शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे यांनी येथे बोलताना दिली.तान्हा पोळा उत्सव समिती वडेगावच्या वतीने मंडई चौकात आयोजित यावर्षीच्या तान्हा पोळा कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, उद्घाटक आ.विजय रहांगडाले, नंदीपूजक जि.प.चे सभापती पी.जी. कटरे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आ.दिलीप बन्सोड, भूमीपूजक पं.स. सभापती उषा किंदरले आदी होते.अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन व तैलचित्राच्या पूजनानंतर कार्यक्रमाची रितसर सुरुवात करण्यात आली. यावेळी जनता भजन मंडळातर्फे भोजराम पटले यांच्या मार्गदर्शनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. याप्रसंगी महादेव-पार्वतीसह विविध आकर्षक देखावे सादर लक्ष वेधून घेत होते. यावेळी सुमारे ५८० बाळ नंदीधारक आपल्या नंंदीसह शेतकऱ्यांच्या वेशभुषेत सहभागी झाले होते. त्यातील उत्कृष्ट ५० नंदीधारकांना विविध बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट नंदीचे परीक्षण ग्रामसेवक गिरीष भेलावे, गुरव व राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन हिवराज रहांगडाले, आभार मोरेश्वर ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तान्हा पोळा समितीचे अध्यक्ष रामलाल रहांगडाले, सचिव मेघराज चावके, राजेश कावळे, अंकुश राठोड, पुरण टेंभरे, संभाजी ठाकरे, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, विविध संस्थेचे पदाधिकारी व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.यावेळी गोंदिया जिल्हा म.स.बँकेचे उपाध्यक्ष राधेलाल पटले, जि.प.चे माजी उपाध्यक्ष पंचम बिसेन, प्रेम रहांगडाले, जि.प. सदस्य सुनिता मडावी, पं.स. सदस्य निता रहांग़डाले, सरपंच तुमेश्वरी बघेले, संजयसिंह बैस, यमू नंदेश्वर, सेवा सहकारीचे अध्यक्ष डॉ.गिरधर बिसेन, माजी पं.स. सदस्य तेजराम चव्हाण, उपकार्यकारी अभियंता गोवर्धन बिसेन आदी प्रामुख्याने उपस्थित होते.