सन २०१२ ते २०१४ : शिक्षकांना न्याय देण्यात प्रशासन अपयशीगोंदिया :सन २०१२-१३ व २०१३-१४ मध्ये जि.प. गोंदिया अंतर्गत झालेल्या प्रशासकीय बदल्यांचे प्रवास भाडे (टीए बिल) अजूनपर्यंत प्राप्त झाले नाहीत. वेळोवेळी मागण्या करूनही सदर समस्या मार्गी लागलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात काय गौडबंगाल आहे, हे उघड होणे आवश्यक ठरत आहे.गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी तालुक्यातील कमीत कमी ३० शिक्षकांचे तर संपूर्ण जिल्ह्यातील ३०० शिक्षकांचे सन २०१२ ते १४ पर्यंतच्या झालेल्या बदल्यांचे टीए बिल सर्व पंचायत समित्यांना देण्यात आलेले आहेत. परंतु जिल्हा परिषदेतर्फे टीए बिलांचे अलॉटमेंटच पाठवित नाही तर आम्ही कुठून देणार, असे पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यााबत नेहमी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी शिक्षक संघ व शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी भेट देवून आपल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. परंतु अजूनपर्यंत प्रशासनाला जाग आली नाही. जिल्हा परिषदेत नव्याने निवडून आलेले जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण समितीचे सभापती पी.जी. कटरे यांनी शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळवून द्यावे, अशी अपेक्षा सर्व शिक्षकांनी व्यक्त केली आहे. नक्षलग्रस्त भागात अनेक वर्षांपासून सेवा देत असणारे शिक्षक आपल्या मुलाबाळांपासून, कुटुंबांपासून दूर राहुन कोणत्या मानसिकतेत जीवन जगत असतील, याची जाणिव अधिकारी वर्गांना नसावी का? असा प्रश्न विचारला जात आहे. एकतर त्यांच्या बदल्या त्यांच्या होमब्लॉकमध्ये होत नाहीत आणि नक्षलग्रस्त भागात कार्य करण्यासाठी जाण्यास इतर ब्लॉकमधील शिक्षक किंवा इतर कर्मचारी वर्ग टाळाटाळ करतो. यामध्ये खालपासून वरपर्यंत कसा आणि किती व्यवहार होतो, हे व्यवहार करणाऱ्या व्यक्तींनाच माहीत. परंतु सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षांपासूनचे त्याच भागात नोकरी करणे यासाठी जि.प.कडे काही नियम असतील तर त्यांनी कर्मचाऱ्यांचा जरूर विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जि.प. कर्मचाऱ्यांचे प्रवास भाडे प्रलंबित
By admin | Updated: October 30, 2015 01:55 IST