शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

युवक-युवतींनी अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित करावे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST

तिरोडा : आजचे युग हे स्पर्धेचे युग असून, यामध्ये टिकून राहण्याची कठीण परिश्रम व ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल ...

तिरोडा : आजचे युग हे स्पर्धेचे युग असून, यामध्ये टिकून राहण्याची कठीण परिश्रम व ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. त्याकरिता युवक-युवतींनी अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित करावे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांनी केले.

पोलीस विभाग व अदानी फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने मागील ३ वर्षांपासून जिल्ह्यातील युवक-युवतींकरिता पोलीस-सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. सोमवारी (दि. ६) आयोजित केलेल्या या वर्षीच्या अशाच कार्यक्रमात ते बोलत होते. अदानी पॉवर प्रमुख कांती बिश्वास यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यक्रमात यादव, अदानी पॉवरचे हरिप्रसाद अडथळे, नितीन शिराळकर, सुरक्षा प्रमुख गजेंद्रसिंह शेखावत हे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकातून शिराळकर यांनी, पोलीस सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम हा यादव यांचीच संकल्पना असून, त्यांच्याच प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना याचा लाभ मिळत आहे, असे सांगितले. अडथळे व गजेंद्र सिंग शेखावत यांनीसुद्धा प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते प्रशिक्षणामध्ये सहभागी १०० प्रशिक्षणार्थींना ट्रॅक सूट किट वितरित करण्यात आले. सूत्रसंचालन करून आभार अदानी फाउंडेशनचे प्रकल्प अधिकारी राहुल शेजव यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशिक्षक प्रशांत कावळे व सचिन बिसेन यांनी सहकार्य केले.