शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीही पावसाची टक्केवारी कमीच

By admin | Updated: May 23, 2015 01:41 IST

गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ७२ टक्के पाऊस बरसला. यावर्षी राज्यात सरासरी ९३ टक्के पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

योग्य नियोजन करा : कृषी विभागाने दिला शेतकऱ्यांना सल्लागोंदिया : गेल्यावर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ७२ टक्के पाऊस बरसला. यावर्षी राज्यात सरासरी ९३ टक्के पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यावर्षीही कमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधपणे पिकांची लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने १.९५ लाख हेक्टरमध्ये विविध पिकांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. भात पिकाची लागवड केली जात असल्याने विविध वाणाचे ४४ हजार क्विंटल भात बियाणे तालुकानिहाय विक्री केंद्रावर उपलब्ध करवून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाबीजकडून तालुकानिहाय बियाणे पुरवठा करण्यात येणार आहे. गोंदिया तालुक्यात - चार हजार ५०० क्विंटल, तिरोडा- चार हजार क्विंटल, आमगाव- चार हजार क्विंटल, गोरेगांव- तीन हजार ५०० क्विंटल, सडक-अर्जुनी- चार हजार ५०० क्विंटल, अर्जुनी-मोरगाव- चार हजार ५०० क्विंटल, सालेकसा- दोन हजार क्विंटल, देवरी- तीन हजार क्विंटल असे एकूण ३० हजार क्विंटल भात बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खाजगी कंपन्यांकडून १४ हजार क्विंटल पुरवठाचे नियोजन असून एकूण ४४ हजार क्विंटल भात बियाणे उपलब्ध होणार आहे. खरीप हंगामासाठी शासनाकडून ५८ हजार १०० मेट्रीक टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले असून तालुकानिहाय कृषी केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके योग्य दर्जाचे उपलब्ध व्हावे म्हणून जास्तीत जास्त नमूने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्याचे निर्देश सबंधितांना देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी पंचायत समितीकडे संपर्क साधून तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. खरेदी केलेल्या कृषी निविष्ठाची पक्की पावती प्राप्त करून घ्यावी, बॅग/कंटेनरवर छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम अदा करू नये. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)श्री पद्धत, रूपांतरित व पेरिव पद्धतीचा वापर कराहवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षीची पावसाचे प्रमाण कमी असून ते अनियमित असण्याची शक्यता आहे. पावसात खंड पडल्यास भात रोपवाटिकेतील रोपे नष्ट होण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी शेतकऱ्यांनी रोपवाटिकेच्या रोपांची लागवड एकाचवेळी न करता ती काही अंतर देऊन (टप्प्याटप्प्याने) करावी. बियाण्यांची कमतरता भासल्यास स्वत:कडीला बियाणे श्री पद्धतीद्वारे रोपे तयार करून आपात्कालीन पेरणीसाठी शिल्लक ठेवावे. रोवणीस उशिर झाल्यास श्री पद्धतीने जास्त लागवड करावी. रूपांतरित श्री पद्धतीने धान पिकांची लागवड करावी. श्री पद्धतीने लागवड करताना हेक्टरी ५ किलो बियाण्यांची आवश्यकता असून १२ ते १५ दिवसांची रोपे लागवडीकरिता वापरता येतील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी कळविले.