शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

रोखरहित व्यवहारावर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 00:21 IST

स्थानिक जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त

युवकांना मार्गदर्शन : पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहारिक ज्ञान आवश्यक गोरेगाव : स्थानिक जगत कला, वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून जगत महाविद्यालय गोरेगाव व तहसील कार्यालय गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोखरहित व्यवहारावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.वाय.लंजे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपप्राचार्य डॉ.एस.एच.भैरम, गोरेगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार एस.बी.माळी, सहाय्यक निबंधक एन.ए.कदम, जिल्हा संचालक तरूण मनूजा, मनिषा डोडानी, सांस्कृतिक प्रमुख डॉ.आर.एन.साखरे, डॉ.सी.एस.राणे उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. एच. भैरम यांनी रोखरहित व्यवहार व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. गोरेगावचे नायब तहसीलदार एस.बी.माळी यांनी आपल्या मार्गदर्शनातून रोखरहित व्यवहार हे राष्ट्रहितास फायदेशीर आहे व जीवनात यशस्वी व्हायचे, असेल तर पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारीक ज्ञान संपादन करायला पाहिजे, असे मौलिक विचार व्यक्त केले. प्रमुख मार्गदर्शक तरुण मनूजा यांनी प्रोजेक्टरद्वारे कॅशलेस व्यवहार कसा करावा? याबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. प्राचार्य डॉ. एन. वाय. लंजे यांनी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श बाळगून खूप अभ्यास करून जीवनरुपी परीक्षेत प्राविण्य प्राप्त करून महाविद्यालयाचे नावलौकिक करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ.सी.एस.राणे, संचालन प्रा. लोकेश कटरे व आभार सांस्कृतिक प्रमुख डॉ.आर.एन.साखरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)