गोंदिया : स्थानिक एस.एस. गर्ल्स महाविद्यालयात शिक्षकांची शोधकार्य संस्कृती वृध्दिंगत करण्याबाबत नुकतेच रिसर्च सेलव्दारे एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अतिथी म्हणून शहरातील नामवंत शिक्षणतज्ञ आणि पी.पी. कॉलेज आॅफ एज्युकेशन गोंदियाचे प्राचार्य डॉ. केशव भांडारकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.के. बहेकार यांनी केले. कार्यक्रमाची रुपरेषा आणि प्रास्ताविक करताना कार्यशाळेच्या संयोजिका प्रा. संध्या वाहाने यांनी केले. त्यात रिसर्च सेलची उद्दिष्ट्ये आणि प्राध्यापक वर्गाच्या शोधकार्य प्रगतीचा आराखडा तयार केला. मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. एन.के. बहेकार यांनी शिक्षण क्षेत्रात शोधकार्याचे महत्त्व विषद करताना प्राध्यापक वर्गाला जास्तीत जास्त संख्येत शोधकार्यात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले. कार्यशाळेचे मुख्य वक्ते डॉ. केशव भांडारकर यांनी खरे शोधकार्य याची सविस्तर व्याख्या सांगितली. याशिवाय त्यांनी खर्या शोधकर्त्याचे विविध गुणवैशिष्ट्ये सोदाहरणासह स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजश्री वाघ यांनी तर आभार डॉ. राजश्री धामोरीकर यांनी मानले. सदर कार्यक्रम प्राचार्य डॉ.एन.के. बहेकार यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यशाळेच्या संयोजिका प्रा. संध्या वाहाने, वरिष्ठ सदस्या डॉ. माधुरी नासरे आणि डॉ. राजश्री धामोरीकर व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व कर्मचार्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
शिक्षकांची शोधकार्य संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी कार्यशाळा
By admin | Updated: May 11, 2014 23:50 IST