शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या कामाने केली शेतकर्‍यांची फजिती

By admin | Updated: May 23, 2014 23:58 IST

पीक तोंडाशी येते तेव्हा ऐनवेळी शेतकर्‍यांवर कोणते न कोणते संकट येत असते. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने शेतकर्‍यांसह सामान्य नागरिकांना सातत्याने समस्यांनी ग्रासले आहे.

काचेवानी : पीक तोंडाशी येते तेव्हा ऐनवेळी शेतकर्‍यांवर कोणते न कोणते संकट येत असते. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने शेतकर्‍यांसह सामान्य नागरिकांना सातत्याने समस्यांनी ग्रासले आहे. धान पीक तोंडावर येत असताना शेतकर्‍यांच्या तोंडाचे पाणी सुकायला लागते. अशीच परिस्थिती यावेळी दिसून येत आहे. यावर्षी सगळीकडे उन्हाळी धानाचे पीक भरपूर प्रमाणात घेतले जात आहे. धानाचे पीक यायला लागले, धान कापणीला आले, परंतु यावेळी परिसरात मग्रारोहयोची कामे सुरु असल्याने आणि मजूर मिळत नसल्याने शेतकरी चिंतातुर झालेले आहेत. धानाची कापणी कशी करावी, मळणी कशी करावी, या समस्या निर्माण झाल्या आहेत. दोन दिवसानंतर रोहिणी नक्षत्र लागणार आहे. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्र लागणार आहे. या नक्षत्रामध्ये पावसाळा सुरु झाल्याचे चिन्ह असतात. जेम-तेम धान कापणी सुरु झाली असून मळणीकरिता आठ दिवस लागतील. त्यामुळे रोहयोची कामे आठ दिवसाकरिता बंद करण्याची कार्यवाही संबंधित ग्रामपंचायतने करणे गरजेचे झाले आहे. रोहयोचे ज्या ठिकाणी कामे आहेत आणि त्या ठिकाणी उन्हाळी धान पीक घेतले आहे, अशा गावातील सुरु असलेली रोहयोची कामे बंद करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. निसर्ग तर कुणाचे ऐकून घेत नाही. परंतु आपण सर्व समजून-ऐकून घेणारे आहोत. त्यामुळे वर्तमान समस्येला आणि नुकसानीला पाहता शेतकर्‍यांच्या कष्टाची आणि अन्नाची नासाडी थांबविण्याकरिता काही दिवसांसाठी रोहयोची कामे थांबविण्यात यावी, अशी शेतकर्‍यांची मागणी आता जोर धरत आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या शेवटी आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली होती. त्याचा परिणाम असा झाला की, शेतकरी उन्हाळी धान पिके कापू शकले नाही. ज्यांनी कापले त्यांनी मळणी केली नाही, पावसाच्या पाण्यामुळे शेतातील धानपीक खराब झाले होते. काही शेतकर्‍यांनी त्या खराब झालेल्या धान पि काचीसुद्धा मळणी केली. असे करता-करता आलेले पीक मातीमोल झाले. यावर्षीची परिस्थिती अशीच दिसून येत आहे. शेतकर्‍यांच्या हिताकरिता रोजगार हमी योजनेची कामे बंद करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. (वार्ताहर)