शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिलांचा ‘एल्गार’

By admin | Updated: May 29, 2017 01:55 IST

ग्रामपंचायत कावराबांध अंतर्गत सर्व वैध व अवैध दारूची दुकाने तसेच बियरबारची दुकाने कायमची बंद करण्यात यावी,

अधिकाऱ्यांना दिले निवेदन : दारू दुकान कायमचे हटविण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : ग्रामपंचायत कावराबांध अंतर्गत सर्व वैध व अवैध दारूची दुकाने तसेच बियरबारची दुकाने कायमची बंद करण्यात यावी, यासाठी गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली. दारुबंदी विषयक परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमक्ष जोरदार घोषणा देत आपला आवाज बुलंद केला. दारूबंदी करण्याचे निवेदन दिले.१ एप्रिलपासून महामार्गालगत सर्व दारुची दुकाने व बियरबार बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या अनुषंगाने कुणबीटोला येथील देशी दारु दुकान आणि बियरबार बंद करण्यात आली. ती दुकान पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे बघून गावातील महिला-पुरुषांनी गोंदियातील संबंधीत अधिकाऱ्याना निवेदन देऊन सदर दुकाने पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अधिकारी देवरी यांनाही निवेदन दिले. गावकऱ्यांच्या निवेदनावर विचार करीत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक आणि त्यांचे सहकाऱ्यांना कावराबांध ग्रामपंचायतला थेथे महिलांनी पाचारण केले होते. कुणबीटोला परिसरातील शेकडो महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत एल्गार पुकारला. निरीक्षकासमोर उभे होवून आपआपल्या घरच्या व्यथा मांडल्या. दारूमुळे पती पिडित महिलांनी व्यथा सांगितली. यावेळी निरीक्षकांनी महिलांच्या मांडलेल्या व्यथा नमूद केल्या. यावेळी ग्रामपंचायत कावराबांधच्या सरपंच मंजुलता बनोठे, पंचायत समिती सदस्या प्रमिला दसरिया, ग्रामपंचायत सदस्या तोमेश्वरी मच्छिरके, प्रमिला नागपुरे, डिलन दसरीया यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. पोलीस पाटील व गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. ग्रामपंचायत कावराबांध अंतर्गत विविध महिला बचत गटाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सदस्य उपस्थित होते. यावेळी सर्व महिलांनी गावातील वैध, अवैध दारूची दुकाने बंद करण्यात यावी तसेच चोरीने अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.निवेदनाला केराची टोपली?दारूबंदीची मागणी करणाऱ्या महिलांची मते जाणून घेतल्यानंतर महिलांनी दारू दुकाने बंद करण्याचे निवेदन दुय्यम निरीक्षकांना दिले ते त्यांनी स्वीकार केले. नंतर काही पदाधिकारी आणि दारूबंदीसाठी पुढाकार घेणाऱ्या लोकांसोबत बोलले की निवेदनावर आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. हे निवेदन आम्ही केराच्या टोपलीत टाकणार, या त्यांच्या भाषेमुळे अनेकांना संशय आला.