शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

महागाईविरोधात महिला काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: June 24, 2016 00:08 IST

वाढत्या महागाई विरोधात सध्या सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे. त्याची झळ महिला वर्गाला अधिक बसत असल्याचा आरोप करत भंडारा...

भंडारा : वाढत्या महागाई विरोधात सध्या सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे. त्याची झळ महिला वर्गाला अधिक बसत असल्याचा आरोप करत भंडारा जिल्हा महिला काँग्रेसने त्रिमूर्ती चौक भंडारा येथे महिलांनी ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करत निदर्शने केली.महिला काँग्रेसच्या वतीने भंडारा जिल्हा परिषद चौकातून भाजपाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. विविध कर देखील वाढले आहेत. त्यामुळे जगायचे कसे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. निवडणुकीआधी भाजपा सरकारने अनेक आश्वासने दिली. आज ही आश्वासने हवेतच विरली आहेत. त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण त्यांना करून द्यावी, त्यांना जाग आणावी म्हणूनच हा मोर्चा काढण्यात आल्याचे भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा भुरे यांनी स्पष्ट केले. भाज्या, फळभाज्या, तेल, डाळ, पेट्रोल, डिझेलचे भाव वाढतच असल्याने सर्वच स्तरावरील नागरिकांचे जगणे दुरापास्त झाल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झालेल्या होत्या. परंतु भाजपा कार्यालयाकडे जात असताना पोलिसांनी हा मोर्चा वाटेतच अडविला. त्यामुळे त्रिमूर्ती चौकातच हा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळ असो वा संध्याकाळ, जेवणातून गायब झाली डाळ, महागाई की मार भारी है, अब मोदी सरकार की जाने की बारी है. अशा घोषणा देण्यात आल्या. या मोर्चाचे नेतृत्व भंडारा जिल्हा काँग्रेस अध्यक्षा सीमा भुरे, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, मोहाडीच्या नगराध्यक्षा स्वाती निमजे यांनी केले. यावेळी जि.प. सदस्य वंदना पंधरे, जि.प. सदस्य रेखा वासनिक, मंदा गणवीर, सुगंधा नंदागवळी, मंगला बगमार, सभापती पं.स. लाखांदूर, कल्पना जांभुळकर लाखनी, मिरा उरकुडकर पवनी, भारती लिमजे भंडारा, मोहीनी नंदनवार, ताराबाई नागपुरे, अस्मिता वाघमारे, निरंजना साठवणे, सीमा साठवणे, वंदना मेश्राम, गीता बोकडे, सुनिता सोरते, सीमा बावणे, शोभा करडे, अरुणा श्रीपाद, प्रिती बागडे, लिला पाथोडे, माला फुंडे व असंख्य महिला कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)