शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

‘वाण’ खरेदीसाठी महिलांची धाव

By admin | Updated: January 16, 2017 00:19 IST

सौभाग्याचा सण म्हणून साजरा केल्या जात असलेल्या मकर संक्रांतीत तीळ-गुळाचे मान आहे.

हळदीकुंकूचे आयोजन जोमात : बाजारात वाढली महिलांची गर्दी गोंदिया : सौभाग्याचा सण म्हणून साजरा केल्या जात असलेल्या मकर संक्रांतीत तीळ-गुळाचे मान आहे. तर सोबतच सौभाग्यवती हळदीकुंकूचे आयोजन करून त्यात ‘वाण’ देतात. वाणात एखादी वस्तू जरी वाटली जात असली तरी ती सौभाग्याची निशानी असल्याने सध्या ‘वाण’ खरेदीसाठी महिला धाव घेत आहेत. यामुळेच बाजारात महिलांची गर्दी दिसून येत आहे. संक्रांत म्हटली की तीळ-गुळाचे लाडू डोळ््यासमोर येतात. मात्र संक्रांतीचा हा सण फक्त तीळ-गुळाच्या लाडू पुरताच मर्यादीत नसून महिलांच्या सौभाग्याचा हा पवित्र सण आहे. त्यामुळेच सौभाग्यवती महिला संक्रांतीत हळदीकुंकूचे आयोजन करून सौभाग्यवतींना हळदीकुंकू व त्यात ‘वाण’ देतात. ‘वाण’ म्हणजे ही एखादी वस्तू असते. मात्र सौभाग्याचे प्रतीक म्हणून ते दिले जात असल्याने त्याचे मुल्य काही औरच असते. यामुळेच मकर संक्रांतीत वाणालाही तेवढेच महत्व आहे. बाजारात सध्या ‘वाण’ खरेदीला जोम आला आहे. आपल्या पसंतीची वस्तू वाणात द्यायला खरेदी करण्यासाठी महिला बाजाराची धाव घेत आहे. तर संक्रांतीचे निमित्त साधून दुकानदारही वाणासाठी विविध प्रकारच्या वस्तू मागवून आपल्या दुकानी सज्ज करून आहेत. ‘वाण’ देताना आपल्या मर्जीचे असावे यासाठी महिला स्वत: आपल्या पसंतीची वस्तू खरेदी करतात. यामुळेच बाजारात महिलांची गर्दी जास्त दिसून येत आहे. आता संक्रांत झाली असून काही ठराविक दिवसांत हळदीकुंकूचे आयोजन करून महिला ‘वाण’ वाटतात. त्यामुळे महिला ‘वाण’ खरेदीसाठी बाजारात येत असून त्यानंतर आपल्या सवडीने हळदीकुंकू ठेवतात. (शहर प्रतिनिधी) महिलांच्या हक्काचा काळ एरवी महिला आपल्या घरातील कामातच व्यस्त असतात व त्यांची ओळखीच्या महिला व मैत्रीणींसोबत भेट होत नाही. घरातील कामामुळे त्यांना घराबाहेर पडणे कठीण असते. किंवा काम करणाऱ्या महिलांना आपल्या कामातूनच वेळ काढून बाहेर जाण्याची सवड नसते. मात्र संक्रांतीचा हा काळ म्हणजे महिलांच्या हक्काचा काळच असतो. संक्रांतीनिमित्त आयोजीत हळदीकुंकूच्या माध्यमातून या महिलांची आपसात भेट होते. परिणामी प्रत्येकच महिला कसा तरी वेळ काढून दररोज हळदीकुंकूला हजेरी लावते. सायंकाळ होताच महिलांचे ग्रुप हळदीकुंकूसाठी जाताना दिसतात व पुरूष घरी असतात. म्हणूनच संक्रांत म्हणजे महिलांच्या बाहेर फिरण्याचा हक्काचा काळ म्हटला जातो.