शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

विकासात महिलांची महत्त्वाची भूमिका

By admin | Updated: June 17, 2017 00:24 IST

केंद्र तसेच राज्य सरकार समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करीत असून या योजनांच्या यशस्वीतेमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे.

उषा मेंढे यांचे प्रतिपादन : विशेष प्रचार अभियानाचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : केंद्र तसेच राज्य सरकार समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करीत असून या योजनांच्या यशस्वीतेमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. देशाच्या सकारात्मक विकासामध्ये महिलांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले. लगतच्या ग्राम कुडवा येथे भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्यावतीने गुरूवारी (दि.१५) विविध योजनांच्या प्रचारार्थ आयोजित विशेष प्रचार अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती माधूरी हरीणखेडे, जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, गट विकास अधिकारी एस.व्ही.इस्कापे, तालुका आरोग्य अधिकारी वेदप्रकाश चौरागडे, कुडवाचे सरपंच शैलेंद्र वासनिक, जिल्हा परिषदेच्या सदस्य खुशबू टेंभरे, पंचायत समिती सदस्य किर्ती पटले, बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक अनिल कुमार, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक राणे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना मेंढे यांनी, महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. आज महिला ही अबला नसून देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. देशाच्या आणि स्वत:चा विकास साध्य करण्यासाठी महिलांनी विकासाच्या या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. बँक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक अनिल कुमार यांनी, जनधन तसेच, विमा योजनाबद्दल माहिती देत, आज बँकेमार्फत एकूण ५३ योजना राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकांनी आपल्या बँक खात्यासोबत आधार क्रमांक लिंक करण्याचे आवाहन केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांनी, ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ बाबत बोलतांना सन १९५१ मध्ये पहिल्या जनगणनेने दर एक हजारी पुरुषामागे ९५६ महिला असे प्रमाण होते. हे आज ९१८ असे आहे. ही तफावत दुर करण्यासाठी ‘बेटी बचाआ-बेटी पढाओ’ ही योजना राबविण्यात येत असून स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यावर त्यांनी भर दिला. स्वच्छ भारत अभियानाबाबत बोलतांना उपमुख्य कार्यपालन अधिकारी देशमुख यांनी स्वच्छ भारत अभियानाबाबत सर्वांनी सक्र ीय सहभाग घेण्याचे आवाहन केले. या विशेष प्रचार अभियानाची सुरु वात योग प्रात्यिक्षकेने करण्यात आली. आर्ट आॅफ लिव्हींगचे राष्ट्रीय योग प्रशिक्षक समीर उपाध्याय यांनी योगाबाबत माहिती देऊन योगाबाबतचे प्रात्यिक्षिक करुन दाखिवले. यात उपस्थितांनी सहभाग घेतला. प्रास्ताविक नागपूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी मनोज सोनवने यांनी मांडले. जनजागृती रॅली काढली विशेष प्रचार अभियानानिमित्त सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली होती. सरपंच वासनिक यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला रवाना केले. या रॅलीत महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. विशेष प्रचार अभियानाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. विभागाच्यावतीने प्रदर्शनी लावण्यात आली होती. यामध्ये बँक आॅफ इंडिया, आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, स्वच्छ भारत मिशन आदींनी आपल्या योजनांबाबत माहिती दिली.